“Ek Ped Maa Ke Naam” “एक पेड माँ के नाम”

0

महात्मा गांधी महाविद्यालयात रासेयो विभागाचा वतीने “एक पेड माँ के नाम” उपक्रमांतर्गत वृक्षारोपण

स्थानिक महात्मा गांधी महाविद्यालय, आरमोरी  (Mahatma Gandhi College Armori )येथे भारत देश व जगभरातील सर्व नागरिकांना मातृत्व आणि पर्यावरण संवर्धनासाठी मा. पंतप्रधान यांनी “एक पेड माँ के नाम” हा उपक्रम सुरू केला आहे. यानिमित्त महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा (Dr. Lal Singh Khalsa)यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने “एक पेड माँ के नाम” या उपक्रमांतर्गत महाविद्यालय परिसरामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आला.

त्यामध्ये नीम, जांभूळ, रिठा आंबा अशा विविध प्रजातीच्या वृक्षांच्या रोपट्यांची लागवड करण्यात आली.
याप्रसंगी मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळ, आरमोरीचे सचिव मा. मनोजभाऊ वनमाळी, मा. दिपकजी बेहरे, हरिश्चंद्रजी बोदरे,मा. केशवराव कुंभारे, श्री दिपकजी वनमाळी,श्री. मयूरभाऊ वनमाळी, श्री. राजूभाऊ गारोडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा, महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य साईनाथ अद्दलवर, स्व. वत्सलभाई वनमाळी स्कुल ऑफ स्कॉलर चे प्राचार्य श्री. नितीन कासार, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. गजेंद्र कढव, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. सुनंदा कुमरे, डॉ. वसंता कहालकर, डॉ. विजय गोरडे आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वप्रथम स्व. वत्सलाबाई वनमाळी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला

ek ped maa ke naam abhiyan
ek ped maa ke naam poster
meri lifeB
plantation
van mahotsav

Ek ped maa ke naam in english
Ek ped maa ke naam pledge
Ek ped maa ke naam yojana
Ek ped maa ke naam poster
Ek ped maa ke naam in hindi
Ek ped maa ke naam logo
Ek ped maa ke naam upsc
Ek ped maa ke naam rajasthan