आठवा मैल चौकात तिहेरी अपघात . . .

0

(Wadi)वाडी प्रति : (Nagpur Amravati Highway)नागपूर अमरावती महामार्गावर ८ वा मैल चौकात राठी दवाखान्याजवळ तिहेरी अपघात झाला अक्षय सुभाषराव गिरनाले मु रत्नापूर , कापुसतळणी ता अंजनगाव ( सुर्जी ) जील्हा अमरावती हे इर्टिका डीआय MH १२ LV 5939 या गाडी पत्नी रजनी हिला नागपूरला ईव्हीएस दवाखान्यात तपासणी करिता गेले त्यांच्या गाडीत ईव्हीस दवाखान्याच्या फाईल होत्या तपासणी करून नागपूर अमरावती महामार्गाने येत असतांना ८ वा मैल चौकात त्यांची गाडी डिवायडर ओलांडून पुन्हा नागपूर दिशेला झाली तेव्हा त्याच्याच गाडीने ९०९ लोडिंग ट्रकला शुद्धा धडक दिली MH 40 CM 3038 तसेच नागपूर कडे येणारी अल्टो गाडी हिला शुद्धा ठोस दिली MH 40 BJ 3872 .

अपघात ऐवढा भयंकर होता की नवरा बायको दोघांनीही गाडीतच दम तोडला त्यांची मुलगी मागच्या सिटवर बसली ती बचावली परंतु तिच्या पायाला गंभीर दुखापत असल्यामुळे तिला खाजगी दवाखान्यात रविनगर येथील दंदे हॉस्पीटल मध्ये भर्ती केले आहे अक्षय गिरनाले व रजनी गिरनाले यांचे शव पोस्टमार्टम करिता मेयो हॉस्पीटल येथे पाठविण्यात आले .

वाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक रायन्नावार अधिक तपास करीत आहेत .