

नागपूर (Nagpur) ०६ एप्रिल २०२५: शाश्वत उत्पादन विकासासाठी कार्यक्षमता महत्वाची असल्याचे प्रतिपादन डागा ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक आणि संचालक कमलेश डागा यांनी केले. नागपूरमधील सिव्हिल लाईन्स येथील चिटणवीस सेंटर येथे आयोजित विदर्भ मॅनेजमेंट असोसिएशन (व्हीएमए) च्या साप्ताहिक सत्रात ते बोलत होते. त्यांच्या सत्राचा विषय “अनुकरणीय आणि शाश्वत उत्पादन व्यवसाय तयार करणे” हा होता.
डागा यांनी पुढे सांगितले की लीन मॅन्युफॅक्चरिंग अर्थात किमान कचरा आणि कमाल उत्पादन, कामाची गती आणि व्यक्तशीरपणा हे उत्तम कार्यक्षमतेचे प्रमुख घटक आहेत, तर पुरेसा रोख प्रवाह आणि वैविध्यपूर्ण मार्गाने येणारा महसूल हे उत्पादन-आधारित व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहेत.
सुविधांचा प्रभावीपणे पुनर्वापर केल्याने दीर्घकालीन शाश्वतता सुनिश्चित केली जाते. उपकरणे आणि कामगारांमध्ये धोरणात्मक गुंतवणुकीद्वारे देखील शाश्वत वाढ शक्य असल्याचे डागा म्हणाले. याशिवाय कार्यबल विकास, जोखीम व्यवस्थापन आणि मजबूत पुरवठा साखळी यांचे महत्त्व देखील त्यांनी अधोरेखित केले.या सत्राचे सूत्रसंचालन विनोद साबू यांनी केले, तर रोहित दुजारी सत्र प्रभारी होते.