

शिक्षणाने मन, मेंदू आणी मनगट मजबूत झाले पाहिजे – विक्रमजीत कलाने (Vikramjit Kalane)
नागभीड (Nagbhid):
आपण दररोज शाळेत शिक्षण घेण्यासाठी येत असतो. आपल्याला जे शिक्षण मिळते त्या शिक्षणाच्या माध्यमातून आपले मन, मेंदू, मनगट मजबूत झाले पाहिजे व आपण देश कार्यासाठी नेहमी समोर असलो पाहिजे असे मत अभाविप विदर्भ प्रांत संघटन मंत्री विक्रमजितजी कलाने यांनी सरस्वती ज्ञान मंदिर , नागभीड येथे आयोजित गणवेश वितरण सोहळ्यात विद्यार्थ्याशी संवाद साधताना मांडले. यावर्षी स्व. शकुंतलाबाई होमराजजी गजपुरे यांच्या स्मरणार्थ इयत्ता पहिली व पाचवी च्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने गणवेश वितरण करण्यात आले.
या प्रसंगी शाळेचे संस्थापक संजय गजपुरे यांनी आपल्या मनोगतातून उपस्थित सर्व मान्यवरांना शाळेच्या वाटचालीबद्दल माहिती दिली. याप्रसंगी अभाविप विदर्भ प्रांतमंत्री कु. पायलताई किन्नाके (ABVP Vidarbha Provincial Minister Ms. Payaltai Kinnake)यांनी विद्यार्थ्याशी संवाद साधताना जीवनात यश संपादन करण्यासाठी आपल्या अंगी उत्तम सवयी लावणे फार आवश्यक आहे असे मत व्यक्त केले. यावेळी अभाविप जिल्हा संयोजिका कु. भूमिका गेडाम (ABVP District Coordinator Ms. Bhumika Gedam), अभाविप जिल्हा संघटन मंत्री ऋत्विक कनोजिया, शाळेचे मुख्याध्यापक गोकुळ पानसे सर यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. शिक्षिका सौ. किरण गजपुरे यांनी केले तर आभार सहा. शिक्षक पराग भानारकर यांनी मानले . सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहा. शिक्षक आशिष गोंडाने, सतीश जिवतोडे, सहा. शिक्षिका आशा राजूरकर, पूजा जिवतोडे, मेघा राऊत, श्रद्धा वाढई यांनी प्रयत्न केले.