
बारामती BARAMATI : मनी लॉड्रींग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने आमदार ROHIT PAWAR रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर Baramati Agro Company छापा घातल्याची माहिती आहे. पुणे व बारामतीसह जवळपास ६ ठिकाणांवर छापेमारी सुरु असल्याची माहिती असून या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळीच ईडीचे पथक येथे दाखल झाले. कंपनीच्या कार्यालयात अन्य लोकांना प्रवेश देणे बंद करण्यात आले. यासंदर्भात कारवाईसंदर्भात कुठलीही अधिकृत माहिती पुढे आलेली नाही. गेल्या वर्षी रोहित पवार यांना याबाबत नोटीस आली होती. आता त्यांच्या कंपनीवर छापेमारी करण्यात आली आहे.
दरम्यान, या कारवाईनंतर आमदार रोहित पवार यांनी याबाबत सूचक वक्तव्य केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा. ज्यांनी पिढ्यान् पिढ्या महाराष्ट्र धर्म जपला आणि वाढवला. अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्याने महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे. म्हणून मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाचीही तयारी ठेवावी लागेल…”
दरम्यान, राजकीय वर्तुळात या छापेमारीमुळे खळबळ माजली आहे.