एड. बाबासाहेब वासाडे यांचे निधन

0

एड. बाबासाहेब वासाडे यांचे वयाच्या 84 व्या वर्षी चंद्रपुरात राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. रा. कॉ. शरद पवार पक्षाचे संस्थपक शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या एड. वासाडे यांना विदर्भात सहकार महर्षी रुपात ओळख होती. एड. वासाडे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे दीर्घकाळ अध्यक्ष होते. त्यांच्या काळात बँकेने नेत्रदीपक प्रगती साधली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाळा- महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये उघडून त्यांनी जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीत वाटा उचलला होता. चंद्रपूरच्या शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक वर्तुळातील नागरिक नागपूर महामार्गावरील त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी दाखल होत आहेत.. उद्या सकाळी चंद्रपुरात शांतिधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर त्यसंस्कार केले जाणार आहेत.