
(Buldhana)बुलढाणा – बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, लोणार तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पावसासह गारपीट झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची माहिती मिळताच खा. प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर धाव घेत नुकसानीची पाहणी केली. अधिकाऱ्यांना बोलावून त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का, माळ सावरगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन (MP Prataprav Jadhav)खा. प्रतापराव जाधव यांनी पाहणी केली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
नेट शेड, भाजीपाला, तुर, गहू, हरभरा पिकांच्या शेतात पाणी साचलेले आहे. तर कुठे गारांचा थर असल्याचे थर असल्याचे खा. जाधव यांनी सांगितले आहे. यावेळी खा.जाधव यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी यांना तातडीने आजच्या आज पंचनामे करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.