


ज्येष्ठ नागरिक महामंडळ (विदर्भ) चा 1 ऑक्टोबर रोजी कार्यक्रम
नागपूर (Nagpur), 29 सप्टेंबर
ज्येष्ठ नागरिक महामंडळ (विदर्भ) नागपूरतर्फे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त मंगळवार, 1 ऑक्टोबर रोजी माजी खासदार दत्ता मेघे यांना ‘ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. जगनाडे चौक, नंदनवन येथील अनसूया माता सभागृहात सकाळी 9.30 वाजता हा कार्यक्रम होईल.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रख्यात विदुषी डॉ. रमा गोळवलकर उपस्थित राहतील. या कार्यक्रमात ज्येष्ठांसाठी विशेष सेवा प्रकल्प, युवक-ज्येष्ठ आधार प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच, ज्येष्ठांसाठी असलेल्या सेवा, सुविधा, सवलती याबाबत माहिती देणार्या पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल. यावेळी ज्येष्ठांसाठी ‘सूरसंगम’ हा गाण्याचा कार्यक्रमदेखील होईल.
कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक, तरुण-तरुणी, गृहिणींसह मंडळाच्या सर्व सदस्यांनी सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक महामंडळ (विदर्भ) अध्यक्ष प्रभुजी देशपांडे, कार्याध्यक्ष अॅड. स्मिता देशपांडे आणि सचिव अॅड. अविनाश तेलंग यांनी केली आहे.