बुलढाणा – बुलढाणा जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून काही दिवसांच्या अंतराने अवकाळी पाऊस होत आहे, यामुळे काढणीला आलेले हळद पीक जास्त दिवस शेतात राहिल्याने त्याला बुरशी लागली आणि अंकुर आले इआहेत त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
बुलढाणा जिल्ह्यात इतर पारंपारिक पिकासोबत हळद पिकाच्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा चांगलाच कल वाढला आहे, चिखली तालुक्यातील गणेश निकम, निलेश पाखारे यांनी आपल्या शेतात लावलेली हळद पावसामुळे काढणीला वेळ झाल्याने या हळदीला बुरशी लागली आहे, आणि त्यामुळे आता भाव कमी मिळणार असल्याने शेतकऱ्याचे चांगलेच नुकसान झाले आहे… त्याचबरोबर या अवकाळी पावसाने रब्बी पिकासह पालेभाज्या व फळ पिकांचे देखील अतोनात नुकसान झाले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आता सरकारकडून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.













