एपीएमसी बाजारात आवक घटल्याने तूरडाळ महागली

0

 

(Mumbai)मुंबई– नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात तूरडाळीचे दर वाढले आहेत. तूरडाळीच्या दरात प्रति किलोला दहा ते पंधरा रुपयांनी वाढ झाली आहे. बाजारात मागील अनेक दिवसांपासून तूरडाळीची आवक घटल्याने त्याचा परिणाम दरावर झाला आहे. लातूर, गुजरात, उत्तर प्रदेश आणि अन्य ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात तूरडाळ येत आहे. काही दिवसात आवक अजून वाढण्याची आशा व्यापऱ्यांनी व्यक्त केली आहे. दर वाढल्याने ग्राहक नाही आहे त्यामुळे व्यापारी चिंतेत आहेत.