

नाशिक (NASHIK)– (Senior Leader, Minister Chhagan Bhujbalan)ज्येष्ठ नेते,मंत्री छगन भुजबळांच्या बंगल्यावर कुणाची नजर ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. भुजबळांच्या निवासस्थानी पोलिसांनी पाहणी केली असता रात्रीच्या वेळी ड्रोनद्वारे भुजबळ फार्मची टेहळणी केल्याची कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली.
यासंदर्भात भुजबळांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांने अंबड पोलिसांकडे चौकशीची मागणी केली.नाशिक पोलिसांकडून तातडीनं चौकशी सुरू झाली असून नाशिकमधून महायुतीचे उमेदवार म्हणून भुजबळांच्या नावाची चर्चा सुरू असतांना हा प्रकार घडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.