

नागपूर (Nagpur),राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुभाष चौधरी यांचे आज दुःखद निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून यकृताच्या आजाराने ग्रस्त होते.अतीशय मितभाषी असलेले डॉ चौधरी विद्यार्थी वर्तूळात लोकप्रिय होते.गेल्या जानेवारी -२०२४ मध्ये ग्रंथालय भारती आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील ग्रंथपालांची राष्ट्रीय स्तरावर एका कार्यशाळेचे आयोजन केले होते.या कार्यशाळा यशस्वीतेसाठी डॉ चौधरी यांनी ग्रंथालय भारती ला पुर्ण सहकार्य केले होते.शिक्षण क्षेत्रातील एक तरूण दिग्गज शिक्षणतज्ज्ञ आपण गमावला आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले. माहितीनुसार, यकृताची समस्या असल्याने त्यांच्यावर नागपुरातील किंग्सवे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होता.
यातच आज सकाळी त्यांचे निधन झाले. कुलगुरू म्हणून भ्रष्टाचार आणि गैरवर्तणूक केल्याप्रकरणी डॉ चौधरी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान त्यांच्या अशा अकाली जाण्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
गडकरी यांनी केलेल्या ट्विटमध्ये लिहले आहे की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुभाष चौधरी यांच्या निधनाचे वृत्त दु:खद आहे. त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली. शैक्षणिक क्षेत्रात डॉ चौधरी यांचे भरीव योगदान राहिले आहे. मृदुभाषी आणि विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देणारे कुलगुरू म्हणून ते कायम स्मरणात राहतील.
ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना व सहकाऱ्यांना या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो. ॐ शांती.