RTM University Nagpur :डॉ. सोनू जेसवानी यांनी पत्रकार परिषदेत केले गंभीर आरोप

0

शिक्षण मंचाच्या अध्यक्षा डॉ. कल्पना पांडेंवर कडक कारवाई करा (Dr. Kalpana Pandey)
कोणतेही संवैधानिक पद नसतानाही विदयापीठाच्या प्रत्येक कामात ढवळाढवळ करणाऱ्या शिक्षण मंचाच्या अध्यक्षा डॉ. कल्पना पांडे यांच्‍यावर कडक कारवाई करण्‍यात यावी अशी विनंती गेली 20 वर्षे व्हीएमव्ही कॉलेजमध्ये हिंदीच्या शिक्षिका असलेल्या डॉ. सोनू जेसवानी (Dr. Sonu Jeswani) यांनी केली आहे.

डॉ. कल्‍पना पांडे यांनी माझे विद्यापीठातील करिअर पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे, असा आरोप डॉ. सोनू जेसवानी यांनी नागपूरच्या प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत शुक्रवारी केला.

मागील 10-12 वर्षांपासून हिंदी विषयाच्‍या संशोधन संचालक असलेल्‍या डॉ. जेसवानी यांनी आपले जीवन विद्यार्थ्यांच्या कल्याण आणि महाविद्यालयाच्या विकासासाठी समर्पित केले आहे. त्‍या म्‍हणाल्‍या, विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी (Former Vice Chancellor Dr. Subhash Chaudhary)यांच्‍या निलंबनाला डॉ. कल्पना पांडे पूर्णपणे जबाबदार आहेत. डॉ. पांडे यांनी विद्यापीठातील पवित्र शैक्षणिक वातावरण भ्रष्टाचाराच्या अड्ड्यात बदलले आहे. अनैतिक मार्गाने पैसे कमावण्यासाठी दुकान थाटले आहे. विद्यार्थ्यांच्या पीएचडीचे ऑनलाईन अहवाल थांबवणे, प्राध्यापकांना ब्लॅकमेल करणे, कंत्राटी प्राध्यापकांच्या पगारातून दहा-वीस टक्के रक्कम कापून स्वत:च्‍या खिशात टाकणे, अनुभवाचा प्राधान्यक्रम पूर्णपणे नाकारून कनिष्ठ प्राध्यापकांना कॉलेज ऑडिट कमिटीत पाठवणे, इत्यादी अवैध कृत्‍यांमध्‍ये त्‍या सहभागी असल्याचा आरोप डॉ. सोनू जेसवानी यांनी केला आहे.

निलंबित कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी हे डोळे मिटून डॉ. कल्पना पांडे यांच्या प्रत्येक अनधिकृत, अन्यायकारक आदेशाचे पालन करत होते. धवनकर प्रकरण आणि मनोज पांडे प्रकरणाच्या फाईल्स मिळाल्यास सर्व काही समोर येईल, असे त्या म्हणाल्या.

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या नावाचा चुकीचा वापर करून कल्पना पांडे यांनी आपली गुंडगिरी सुरूच ठेवली आहे आणि करोडोंचा भ्रष्टाचार केला आहे, असे गंभीर आरोप डॉ. सोनू जेसवानी यांनी यावेळी केले. त्‍यांनी काही मुद्द्यांवर डॉ. पांडे यांच्याशी संबंधित काही प्रश्न जाहीररित्या विचारले आहे.

• सेवानिवृत्तीनंतरही केवळ 11 वर्षांचा वरिष्ठ महाविद्यालयाचा अनुभव असतानाही कल्पना पांडे स्वत: महाविद्यालयाचे ऑडिट करण्यासाठी समित्यांकडे जातात, 15-20 वर्षांचा अनुभव असलेल्या प्राध्यापकांना डावलून लिफाफा कशाच्या आधारावर मिळवतात?

• आमच्या व्हीएमव्ही महाविद्यालयातून लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारी कल्पना पांडे यांना अटक करण्यात आली. त्या प्रकरणाचे काय झाले?
विदयापीठाच्या कुलगुरूंच्या निलंबनानंतर कल्‍पना पांडे यांच्या डोक्यावर तुरुंगात जाण्याची टांगती तलवार असताना, भाजपचे कार्यकर्ते व नेत्यांवर आरोप करणा-या, अहवाल लपवून ठेवणाऱ्या कल्पना पांडे यांचा संपूर्ण भ्रष्टाचार तपास समित्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्‍यांनी यावेळी केली.
कल्पना पांडे यांनी महिलांच्या सन्मानाला कलंकित करून, शिक्षण मंचसारख्या प्रतिष्ठित शिक्षक संघटनेचे नाव, प्रतिष्ठित व्हीएमव्ही महाविद्यालयाचे नाव, प्रतिष्ठित रातुम नागपूर विदयापीठाचे  (RTM Nagpur University) नाव बदनाम करून केले आहे. त्‍यामुळे विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या सिनेट सदस्यांची प्रतिमा देखील मलिन झाली आहे, असे देखील जेसवानी म्हणाल्या.

जेसवानी यांनी त्‍यांच्‍या झालेल्‍या वैयक्तिक हानीवर भाष्‍य केले. त्‍या म्‍हणाल्‍या, त्यांची हिंदी विषयाची गाईडशिप हिसकावून घेणे, विद्यापिठातून हिंदी पीएच.डी. संबंधित आरएसी समितीच्या सदस्यत्वातून त्‍यांना काढून टाकणे, विदयापीठाच्या हिंदी अभ्यास मंडळाच्या सदस्यत्वातून काढून टाकणे, विदयापीठाच्या वाणिज्य भाषा अभ्यास मंडळाच्या सदस्यत्वातून काढून टाकणे, विदयापीठ वार्षिक पुस्तक निर्णय समितीच्या सदस्यत्वातून काढून टाकणे, त्यांच्या मुलीच्या लग्नात मदतीच्या नावाखाली घेतलेले एक लाख रुपये अनेकदा विचारना करूनही परत न देणे, वर्गातील विद्यार्थ्यांसमोर, महाविद्यालयातील प्राध्यापकांसमोर, सिंधी समाजाच्या प्रतिनिधींसमोर, आमदार-खासदारांसमोर, वर्तमानपत्रात सन्मान न राखणे, या बाबींचा उल्लेख केला आहे. अनेक वेळा कल्पना पांडेच्या अनुचित आणि असभ्य वर्तनाची तक्रार पोलिसांकडे केली गेली परंतु, त्‍यांनी ती दडपण्‍याचा प्रयत्‍न केला. सत्य आणि मानवता यांना सर्वोच्च मानून कल्‍पना पांडे यांच्यावर कठोर कारवाईची जाहीर मागणी संबंधित विभागांनी करावी, अशी मागणी डॉ. सोनू जेसवानी पत्रकार परिषदेत केली.

संपर्क : डॉ. सुश्री सोनू जेसवानी 9834520028