डॉ. रवींद्र शोभणे यांचा 26 रोजी विविध संस्‍थांतर्फे सत्कार

0

नागपूर(Nagpur), 23 मे 2024 साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा महाराष्‍ट्र शासनाचा ‘विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार’ 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे(Dr. Rabindra Sobhane) यांना प्राप्‍त झाला आहे. त्यानिमित्त रविवार, 26 मे 2024 रोजी विविध संस्‍थांच्‍यावतीने त्यांच्या सत्कार केला जाणार आहे.

झांशी राणी चौकातील विदर्भ साहित्य संघाच्या चौथ्‍या मजल्‍यावरील अमेय दालनात सायंकाळी 6 वाजता होणा-या या कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानी वि.सा. संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते राहणार आहेत. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश गांधी(Dr. Girish Gandhi), महाराष्ट्र टाईम्सचे संपादक श्रीपाद अपराजित, ‘सक्षम समीक्षा’चे संपादक शैलेश त्रिभुवन आणि वि. सा. संघाचे सरचिटणीस विलास मानेकर यांची उपस्थिती राहील. असून यांच्या हस्ते सत्कार व विशेषांकाचे प्रकाशन होणार आहे. ‘सक्षम समिक्षा’ या त्रैमासिकाने काढलेल्या डॉ. रवींद्र शोभणे साहित्य विशेषांकाचे प्रकाशन यावेळी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते केले जाणार आहे. साहित्य प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विदर्भ साहित्य संघ, विदर्भ गौरव प्रतिष्ठान, डॉ. गिरीश गांधी फाऊंडेशन, वनराई फाऊंडेशन, शब्दाली प्रकाशन यांनी केले आहे.