
नागपूर (Nagpur), 25 एप्रिल
डॉ. प्रसाद देशपांडे यांच्या ‘स्तोत्रस्तबकः’ या संस्कृत ग्रंथाचे प्रकाशन रविवार, 27 एप्रिल 2025 रोजी आयोजिले आहे. संस्कृतसह मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमधील भाषांतरासह असलेल्या ग्रंथाचे प्रकाशन नवी दिल्ली येथील केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी यांच्या हस्ते होणार आहे.
प्रसाद प्रकाशन पुणेतर्फे मोरभवन येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलनच्या मधुरम् सभागृहात सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होईल. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नवी दिल्ली येथील भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाचे सभापती वैद्य जयंत देवपुजारी राहणार आहे. या पुस्तकावर श्रीदक्षिणामूर्ती मंदिराचे महंतपीठाधीश मकरंदबुवा हरदास भाष्य करणार आहेत.
या समारंभाला साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रसाद प्रकाशनच्या डॉ. उमा जोशी-बोडस यांनी केले आहे.