
अमरावती – डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त अमरावती येथील श्री शिवाजी कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात शोभिवंत झाडांचे व फुलांच्या प्रदर्शनीचे दालन आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. या पुष्प प्रदर्शनी मध्ये जागतिक 18 वर्गवारी मध्ये 2500 पेक्षा जास्त विविध फुलांच्या व शोभिवंत झाडांच्या प्रजाती या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. सध्या शेवंतीच्या फुलांचा हंगाम सुरु असल्याने सर्व प्रकारच्या रंगांच्या शेवंती या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. सोबतचं बोनसाय केलेले शोभिवंत झाडे, कॅक्टस, पॉमपॉट, ॲनिमोन, बटन, कोरियन, किल्ड, डेकोरेटिव्ह आधी प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत. हे सर्व फुलांचे प्रदर्शन पाहण्यासाठी लाखो लोकांनी या ठिकाणी भेट दिली आहे.