
चंद्रपुर (chandrapur): येथील चांदा शिक्षण प्रसारक मंडल द्वारा संचालित जनता महाविद्यालयतील इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. आय. एस. कोंड्रा यांना त्यांच्या “इंटेग्रेटिंग व्हॅल्यूस अँड एथिक्स इन मॉडर्न एज्युकेशन: द नीड ऑफ द आवर ” या संशोधन निबंधासाठी नागपूर येथील धनवटे नॅशनल कॉलेज तर्फे तृतीय पुरस्कार देऊन यांना सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय संमेलनाच्या पुरस्कार समारंभात प्राचार्य डॉ. ए एल कुलट, प्राचार्य डॉ. प्रशांत कोठे डॉ. चेतन राऊत, डॉ. आशिष तायवाडे इत्यादी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले व यांच्या पुढील संशोधन कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आले.
हा पुरस्कार त्यांच्या संशोधन क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदान व शैक्षणिक क्षेत्रातील प्राध्यापकांवर, शिक्षकांवर आणि विद्यार्थ्यांवर सकारात्मक परिणाम यासाठी दिला गेला असून हा सन्मान जनता महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे.
या यशाबद्दल संस्थेचे सचिव डॉ. अशोकभाऊ जीवतोडे जनता महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आशिष महातळे इतर सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मित्रपरिवार कडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
















