डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच खरे लोकशाही चे जनक – कु. पुजा वीर

0

 सरस्वती ज्ञान मंदिर , नागभीड येथे डॉ.आंबेडकर यांची जयंती साजरी

नागभीड (Nagbhid):
अत्यंत बिकट अशा परिस्थिती मध्ये स्वतःच्या मन,मेंदू व मनगटावर विश्वास ठेवत रात्रदिवस एक करून वैविध्यपूर्ण अभ्यास करून अग्नीदिव्यातुन सुलाखुन निघालेले व्यक्तिमत्व म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत .
दीन, दलित, दुबळ्या, वंचीत समजाला माणूस म्हणून जगण्याचे सामर्थ्य निर्माण करणारे व जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना लिहणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच भारतीय लोकशाही चे जनक असून आजच्या विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब समजून घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे विचार आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी सरस्वती ज्ञान मंदिर च्या सहा. शिक्षिका पुजा वीर (जिवतोडे )यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक गोकुळ पानसे सर होते . प्रमुख अतिथी म्हणून सहा.शिक्षक आशिष गोंडाने, सतीश जिवतोडे, सहा. शिक्षिका किरण वाडीकर , आशा राजूरकर मॅडम, पुजा वीर मॅडम, भावना राऊत मॅडम, श्रद्धा वाढई मॅडम यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून सर्वात प्रथम आदराजंली अर्पण करण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आपल्या विचारातून प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे सहा.शिक्षक पराग भानारकर यांनी केले.