संवाद प्रतिष्ठान तर्फे डॉ. अशोक जीवतोडे यांचा सत्कार

0

जातनिहाय जनगणना या मागणीला लावून धरणाऱ्यांचा बहुसंख्य आवाजात एक आवाज डॉ. अशोक जीवतोडे यांचा; संवाद पदाधिकाऱ्यांच्या भावना

चंद्रपूर (Chandrapur)

पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी देशात जातनिहाय जनगणेची घोषणा केली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून सातत्याने ही मागणी लावून धरली होती. आता या मागणीची पुर्तता झाल्यानंतर ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे यांचा संवाद प्रतिष्ठानच्या वतीने आज (दि.२) ला सत्कार करण्यात आला.

डॉ. अशोक जीवतोडे मागील अनेक वर्षांपासून ओबीसी चळवळीत काम करीत आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या रेट्यामुळे ओबीसी समाजासाठी आवश्यक अनेक शासकीय अध्यादेश निघाले. ओबीसी मंत्रालयाची स्थापना झाली. महाज्योतीची निर्मीती शासनाने केली. या सर्व कामात डॉ. जीवतोडे आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष, महासचिव तसेच सर्व सहकाऱ्यांचे मोठे प्रयत्न होते. त्या सर्वांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि भविष्यातील वाटचालीच्या शुभेच्छा देण्यासाठी जनता महाविद्यालयात आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी संवाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रकांत वासाडे, सचिव विजय बदखल, कोषाध्यक्ष दीपक जेऊरकर, डॅा. विनोद मुसळे, डॅा. सुधीर मत्ते, राहूल बदखल, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, अनुप बोर्डे, सुधीर ठाकरे, अजय बल्की आदींची उपस्थिती होती. डॅा. जीवतोडे यांनी ओबीसी महासंघाच्या माध्यमातून ओबीसींची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. त्यांचे सामाजिक, राजकीय दृश्य-अदृश्य परिणाम बघायला मिळत आहे. राज्याबाहेर अधिवेशन घेवून देशभरातील ओबीसी कार्यकर्त्यांची फळी उभारण्याचे काम राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केले. पंतप्रधान मोदींनी जातनिहाय जनणनेची घोषणा केली. त्यांचे स्वागत सर्व ओबींसींनी केले आहे. सोबत या मागणीला लावून धरणाऱ्यांचा आवाज सुद्धा मोंदींनी ऐकला. त्यातील एक आवाज डॉ. जीवतोडे आणि त्यांच्या संघटनेचा होता, असे मनोगत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले. पंतप्रधान मोदींचा निर्णय मागासवर्गीयांच्या आयुष्यात क्रांतीकारी बदल घडवून आणेल. आतापर्यंत प्रवाहाच्या बाहेर असलेल्या लोकांची दखल या माध्यमातून घेतली जाईल. त्यांना मुख्य प्रवाहात सरकारकडे ठोस आकडेवारी उपलब्ध होईल.

समाज रचनेची नव्याने मांडणी करण्यासाठी हा निर्णय उपयोगी पडेल, अशा भावना डॉ. अशोक जीवतोडे यांनी व्यक्त केल्या.