अँक्यूसॅटतर्फे डॉ. अरविंद शेंडे यांचा सत्कार

0

असोसिएशन ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी सुपर अनुएटेड टीचर्स (महाराष्ट्र) या संघटनेच्‍या नागपूर तसेच, गडचिरोली विभागासाठी कमला नेहरू महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा.डॉ. अरविंद शेंडे यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्‍याबद्दल त्‍यांचा संघटनेतर्फे सत्‍कार करण्‍यात आला.

अत्यंत कमी कालावधीत उत्कृष्ट कामगिरी करून नागपूर व गोंडवाना विद्यापीठातून निवृत्त झालेल्या बऱ्याच प्राध्यापकांना संघटनेशी जोडून त्यांना न्यायालयीन लढा देण्यास प्रवृत्त केले व संघटना मजबूत करण्यात मोलाचा वाटा उचलल्यामुळे त्यांचा महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून औरंगाबाद येथे सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी डॉ. अरविंद शेंडे, डॉ. देवेंद्र मोहतुरे, डॉ. राजेश इंगोले, डॉ. लांजेवार, डॉ. चरलवार, डॉ. पुष्पा तायडे, डॉ. किरण नेरकर, प्रा. संदेश तितरे, डॉ. विजया रघटाटे अशा अनेक प्राचार्यांनी तसेच प्राध्यापकांचे डॉ. अरविंद शेंडे यांनी आभार मानले.