

विदर्भात मुसळधार पावसाचा अलर्ट
Heavy rain alert in Vidarbha :महाराष्ट्रावर सध्या दुहेरी संकट आहे. मुंबईसह उपनगर आणि कोकणात अति उष्णता वाढत आहे. तर दुसरीकडे विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची नोंद करण्यात आली. कोकणात काही भागात अति मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे.
गुजरातमध्ये सर्वात उष्ण तापमान आहे. त्यामुळे तिकडून उष्ण वारे वाहात असल्याने मुंबईसह उपनगरात तापमान वाढ होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि आसपासच्या भागात पुढचे दोन दिवस मध्यम ते तीव्र वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस राहील असा इशारा देण्यात आला आहे.
4 एप्रिल ते 6 एप्रिल पाऊस राहील, पावसाचा जोर हळूहळू कमी होत जाईल. या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि नागरिकांना हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं आणि शेतमालाचं अतोनात नुकसान झालं आहे. महाराष्ट्रात कमाल तापमानात थोडी घट झाली आहे. तर काही भागात 38 ते 40 डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
५ जिल्ह्यांमध्ये अति उष्णता वाढणार आहे. पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडमध्ये 5 ते 7 एप्रिल उष्णता वाढणार असून यलो अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.