“देशभरात रामभक्त आहेत हे विसरु नका”

0

अमरावती(Amravati), 11 मे  अमरावतीच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार नवनीत राणा(Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा एआयएमआयएण प्रमुख असदुद्दीन ओवैसींवर टीका केली आहे. “मी ओवैसींनी आव्हान देते हैदराबादला मी येते मला रोखून दाखवा.” असंही त्या म्हणाल्या. आज देशभरात रामभक्त आहेत हे विसरु नका असंही नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

भाजपाच्या अमरावतीमधील उमेदवार नवनीत राणा यांनी नुकताच हैदराबादमध्ये लोकसभेच्या भाजपाच्या उमेदवार माधवी लता यांच्यासाठी प्रचार केला. यावेळी त्यांनी २०१३ च्या अकबरुद्दीन ओवैसी यांच्या एका विधानावरून ओवैसी बंधूंवर जोरदार टीका केली. “आम्हाला १५ मिनिटे नाही, तर १५ सेकंद लागतील”, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, नवनीत राणांच्या या टीकेला आता असदुद्दीन ओवैसी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“मी तुम्हाला १५ सेकंद नाही, तर १ तास देतो, तुम्ही काय करू शकता सांगा?” असं ओवैसी म्हणाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा रामभक्त प्रत्येक ठिकाणी आहेत असं नवनीत राणांनी ओवैसींना सुनावलं आहे.“आम्हाला १५ सेकंदच लागतील असं त्या पुन्हा एकदा म्हणाल्या आहेत. तसंच आता मी त्यांना सांगू इच्छिते की रामभक्त सगळ्या देशभरात आहेत.” तर ओवैसी यांनी दुसरीकडे असं उत्तर दिलं आहे की तुम्हाला १५ सेकंद काय मी १५ दिवस देतो. काय करायचं आहे ते करुन दाखवा असं उत्तर नवनीत राणांना ओवैसींनी दिलं आहे.