
मुंबई MUMBAI : विरोधकांनी कांद्याच्या प्रश्नावर राजकारण न करण्याचे आवाहन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शरद पवारांना ते देशाचे दहा वर्षे कृषीमंत्री होते, अशी आठवणही करून दिली. केंद्राने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले नसून तातडीने २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. शिंदे यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री AMIT SHAHA अमित शहा यांचे आभार मानले आहेत.
नाफेडने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक आहे. पहिल्यांदाच पूर्वनिर्धारित २४१० प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला. गरज पडल्यास केंद्राकडून आणखी सहकार्य मिळेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.