

आंतरराष्ट्रीय चहा दिन
पूर्वी भारतात पाहुणे आले की गुळ पाणी देण्याची पद्धत होती. आज याची जागा चहाने घेतलीय. भारतात चहा हा अर्थकारणाचा मोठा भाग बनलाय. अगदी ग्रामीण भाग असो वा शहरी भाग या ‘अमृततुल्य’ चहामुळे फार मोठा रोजगार प्राप्त होतोय. आज ‘आंतरराष्ट्रीय चहा दिन’ हा भारताच्या मागणीप्रमाणे संयुक्त राष्ट्र संघाने मान्यता देत जगभर साजरा होतोय.
चहाच्या व्यापाराची व्याप्ती वाढावी.. चहा मळ्यातील मजूरांच्या समस्यांकडे लक्ष वेधून उपाययोजना करण्यासाठी या दिनाचे महत्त्व आहे.
चहाला मोठा इतिहास आहे. चहाचा शोध लागला तो चीनमध्ये. सोळाव्या शतकात चीनचा सम्राट शेनॉन्ग त्याच्या बागेत बसला होता. त्यावेळी उकळत्या पाण्यात एक पान नकळत येवून पडले. पाण्याचा रंग बदलला. चवही आली. हाच तो चहा. आजही चीन हा जगातील सर्वात मोठा चहाचा उत्पादक आणि निर्यातदार देश. तर दुसरा क्रमांक भारताचा आहे. भारतात १८२४ ला चहाचे पान आसाम पर्वतीय भागात सापडले. मग १८३६ मध्ये इंग्रजांनी त्यांच्या गरजेसाठी भारतात चहाचे उत्पादन घेणे सुरू केले.
भारतात जंगली वनस्पती म्हणून चहा सापडला होता. पूढे लागवड सुरू झाली. आसामच्या ब्रह्मपुत्रेलगत चहाची शेती होते. आसाम हा देशातील सर्वात मोठा चहा उत्पादक प्रदेश. जगभरात आसामचा चहा प्रसिध्द आहे. जगावर इंग्रजांचे राज्य होते. त्यांनी ब्रिटिश संसदेत चहा कर लावण्यासाठी.. विक्रीच्या एकाधिकारशाहीसाठी १७७३ मध्ये कायदा संमत केला. चहासाठी एक मोठा वाद.. क्रांती युद्धही झाले ते ‘बोस्टन टी पार्टी’ म्हणून प्रसिद्ध आहे. (Tea Leaves)
इंग्रजी सत्ता भारतात आली. मग घरोघरी पहाट चहाच्या घोटाने होवू लागली. जीवनाचा भाग बनले. आजही जगभरात चहा हे सर्वात स्वस्त लोकप्रिय पेय आहे. खरा चहा कॅमलिया सायनेन्सिस नावाच्या एकाच वनस्पतीच्या प्रजातीपासून काढलेल्या पानांनी बनवला जातो
चीननंतर भारतात चहाचे उत्पादन होत असले तरीही यापैकी ८० % उत्पादन देशातच खपते. केवळ २०% निर्यात होते. अर्थातच देशाच्या गरजेसाठी चहाची आयात करावी लागत नाही.. परकीय चलन वाचते आणि देशभर तळागाळात मोठा रोजगार निर्माण होतो हे महत्त्वाचे. भारतात दार्जिलिंग, आसाम, निलगिरी, कांगडा, मुन्नार, डुअर्स-तेराई, मसाला चहा आणि सिक्किम चहा या जातीत चहाची विभागणी होते.
भारतात समाजातील सर्वच लोकांना जोडणारा.. एकात्मता निर्माण हा ‘चहा’ आहे. नाती बिघडली असतील तर एक कप चहा बिघडलेल्या नात्यातही गोडवा आणतो. कपभर चहा एकत्र प्यायला तर मनभेद.. मतभेद दूर होतात त्याला चहाच्या पेल्यातील वादळ शांत झाले म्हणतात. घट्ट मैत्री आणि अतूट नाती बनवण्यासाठी मैत्रीचा चहा लागतोच. (Tea Benefits)
भारतात चहाची औषधी गुणवत्ता वाढविण्यासाठी गवती चहा.. आले.. वेलदोडे पदार्थ याचा वापर होतो. एकुण काय तर भारतीयांचा आवडता असा हा चहा. ताजेतवाने होण्यासाठी हर्बल टी.. ग्रीन टी.. लेमन टी तसेच आरोग्यदायी आयुर्वेदिक चहा हे चहाचे नवीन प्रकार सध्याच्या तरुणाईची पसंती.
*चहा प्रेमींच्या भावना व्यक्त करणारे हे प्रेमगीत. चहा प्रेमींना आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या शुभेच्छा ! (International Tea Day 2024)
तलप ही सारखी तुझीच लागली
लट ही लागली रोज रोजची
दिन जातो की होऊन टेन्शन फ्री
ओठांना सारखी सवय ही लागली
आराम तू जीवनातला
सुखाला भेटण्याचा
एक बहाणा तू
ओठांवरी क्षणात येणारी
चेहऱ्याची गोड गोड
क्यूटसी स्माईल तू
कितीदा प्यावे तरी कमीच रे
चहाला वेळ नाही रे
पण वेळेला चहा पाहिजे
माझ्या जीवनातले
चहाच पहिलं प्रेम रे
मन विरघळलं साखरवानी
नशा तुझी ही रोजची सुटेना
सुकून देते कटिंग चहाची
कितीही प्यावे तरी मन भरेना
पाहताच तुला तुझीच झाले
तुला भेटण्याचे करते बहाणे
जशी ओठांना तलप चहाची
अशी ओढ तुझी या मनाला लागे
लव स्टोरी तुझ्या माझ्या प्रेमाची
झाली व्हायरल चहाच्या टपरीवर
एक कटिंग घेऊ दोघांत
कधी अद्रक इलायची कधी स्पेशल
आनंद तू जगण्यातला
प्रेमात पडण्याचा
एक हा बहाणा तू
मना मध्ये क्षणात येणारी
सुकून मिळणारी
एक गोड फिलिंग तू
चहामुळे हे प्रेम वाढले
चहाला वेळ नाही रे
पण वेळेला चहा पाहिजे
माझ्या जीवनातले
*चहाच पहिलं प्रेम रे