डीजेच्या दणदणाटात श्रावण सरी झेलत दहीहंडीचा अपूर्व जल्लोष…..!!!!!!!

0

ठाणा पेट्रोलपंप येथे गोविंदांचे ढाक्कुमाकुम

गोविंदा आला रे आला’, ‘एक दोन तीन चार ठाण्यातील पोर हुश्शार च्या तालावर बेधुंद नाचत गोंविद पथकांनी उंच बांधलेल्या दहीहंड्या धरांवर धर लावून दहीं हंडी फोडण्यात आली, येथील ठाणा पेट्रोलपंप येथील ग्रामस्थांनी दहीं हंडी पाहण्यासाठी गर्दी केली होती. रविवारी दुपारपासून विविध मंडळांनी दहीहंडी बांधण्याचे काम सुरु होते. डीजेचा दणदणाट सुरू होताच अनेक तरुण नाचण्यात दंग झाले होते. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून मुख्य चौकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे उद्घाटक विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य तथा माजी मंत्री डॉ, परीयण फुके , व आदी कार्यकर्ते. मोठ्या संख्येने उपस्थित होते,
नुकताच जिल्ह्यात मुसळधार पावसातही शनिवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त गोपाळकाला सण उत्साहात साजरा झाला. दुसऱ्या दिवशीही पावसात चिंब भिजत गोविंदा पथकांनी सणाचा आनंद लुटला. शहरांसह ग्रामीण भागातही पारंपारिक पद्धतीने गोविंदांनी थर लावले. दहीहंडी फोडून बक्षिसांचे लोणी लुटण्यासाठी पथकांची चढाओढ लागली होती.
तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. दोन दिवसापूर्वी सकाळपासूनच पावसाने संपूर्ण तालुक्याला चांगलेच धुतले. त्यानंतरही गोपाळकाला असल्याने संपूर्ण तालुक्यात गोकुळाष्टमीचा उत्सव जल्लोषात साजरा झाला.
या कार्यक्रमाच्या उत्साहासाठी सामाजिक कार्यकर्ता विक्की डोईफोड़े, गोलू बड़वाईक, रोहित तांदुळकर, आकाश चव्हाण, रजत शेंडे, दीपक लेंडे, शुभम कोरे, अभिषेक बागड़े, सत्यम पोटभरे, विनय चकोले, सौरभ गोमासे, मोहित सेलोकर, विराज हारोड़े, क्षितिज कटकवार, रितिक हटवार, समीर रंगारी, रजत मथुरे, सुमित बिसेन, मंथन धुर्वे, तनय हाड़गे, विश्वजीत वैरागड़े, आदींनी सहकार्य करून सहभाग घेतला होता.
………………………………………………………………………………………………………………

युवा पिढीचे योगदान महत्त्वाचे -..!!! डॉ. परिणय फुके
महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील खेळाडूंनी खेळाच्या माध्यमातून पुढे गेले पाहिजे. दहीहंडीचा हा उत्सव एका दिवसापुरता साजरा न करता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना आदर्श मानून युवा पिढीने आपली ताकद ओळखून देश विकसित करण्यासाठी प्रयत्नरत राहिले पाहिजे, असा संदेश विधान परिषद सदस्य तथा माजी मंत्री डॉ परीयण फुके यांनी दिला.
………………………………………………………………………………………………………………

दहीहंडीमधून यशाला गवसणी घालण्याची शिकवण …!!! डोईफोडे
दहीहंडीच्या उत्सवातून भगवान श्रीकृष्णाने उत्साहाने जीवन जगण्याचा संदेश दिला आहे. मनोरे रचण्यातून वर चढायला शिकतो, पडायला शिकतो आणि परत उठायला शिकवतो. कितीही अपयश आले तरी परत उठून त्याच गतीने पुढे जाण्याची शिकवण मिळते असे सामाजिक कार्यकर्ता विक्की डोईफोडे यांनी सांगितले.

ठाणा येथील एकता ग्रुपच्या वतीने जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात बेला येथील ओएसीस इंटरनॅशनल स्कुलच्या गोविंदा पथकाने ३० फुट उंचीवरील दहीहंडी फोडून पहिले बक्षिस पटकाविले

अजय मते
तालुका प्रतिनिधी भंडारा
फोटो आहेत