सांस्‍कृत‍िक कार्यक्रमांनी सजला दिवाळी मिलन सोहळा

0

(Nagpur)नागपूर 29 नोव्हेंबर 2023,
शाईनेक्स मोझॅकच्या मुख्य कार्यालयात सांस्‍कृत‍िक कार्यक्रमांच्‍या आयोजनासह दिवाळी मिलन कार्यक्रम उत्साही व आनंदात पार पडला. व्यवस्थापकीय संचालक (Sachin Palasokar)सचिन पळसोकर आणि संचालन संचालक (Sneha Palasokar)स्नेहा पळसोकर यांच्या हस्‍ते लक्ष्मीपूजन-हवन करण्‍यात आले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले.

(Satish Kapse)सतीश कापसे यांनी कालीघाट पेंटिंगवर कलात्‍मक रांगोळी रेखाटून प्रथम क्रमांक पटकावला. उपविजेती पौर्णिमा गेडाम ठरली. विश्वास आमटे, अमेय देवगडकर, अलका पाटील, मनोरमा ठाकरे, शारदा धांद्रे आणि किरण बेंद्रे यांनी आपल्या गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सुमेध चव्हाण यांनी नृत्‍य सादर केले तर अंताक्षरी स्पर्धेत योगेश कारोकार, दीपक माळवी, संदीप दवंडे, विश्वास आमटे, सौरभ वेखंडे विजेते ठरले. सूत्रसंचालन स्वाती कांबळे व सत्यम मिश्रा यांनी केले. कार्यक्रमाच्‍या यशस्वीतेसाठी एचआर उप व्यवस्थापक विनय सत्तू आणि सहाय्यक व्यवस्थापक रजत केदारपवार यांचे सहकार्य लाभले.