महाराष्ट्रातील हवामान बदलावर जिल्हानिहाय संशोधन

0

नागपुर ,विदर्भात तापमान,उष्ण लहरी आणि अति पावूस वाढणार
सेंटर फॉर सायन्स ,टेक्नोलॉजी अंड पोलीसी ह्या संशोधन संस्थेने महाराष्ट्रातील सर्व जीह्याचा अभ्यास करून धक्कादायक निश्कर्ष काढले आहेत. त्यानुसार उन्हाळा आणि हिवाळ्यातील तापमान मागील ३० वर्षाच्या तुलनेत २०२१-२०५० ह्या काळात १ ते २ अंश सेल्सिअस ने वाढणार असून पावूस आणि अति पावसाचे दिवस आणि प्रमाण वाढणार असल्याचे पूर्वानुमान काढले आहे. ह्यामुळे अनेक दुष्काळग्रस्त जिल्ह्यांना दिलासा मिळणार असला तरी बदलत्या हवामानाचे गंभीर परिणाम महापूर,शेती वने,वन्यजीव,आरोग्य आणि विकास कामावर होणार असल्याचे म्हटले आहे.जागतिक हवामान बदल जोखीम निर्देशांकात भारत आधीच जगात ७ व्या आणि नैसर्गिक आपत्ती निर्देशांकात ३ क्रमांकावर आहे.अशी माहिती पर्यावरण आणि हवामान अभ्यासक प्रा सुरेश चोपणे ह्यांनी दिली आहे.
सेंटर फॉर सायन्स ,टेक्नालोजी अंड पाँलोसी ह्या संस्थेने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यासाठी जानेवारी २०२२ मध्ये हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.भारतीय हवामान विभागाच्या (IMD) आणि IPCC आकडेवारीवरून १९९० ते २०१९ ह्या मागील ३० वर्षाच्या अभ्यासातून २०२१ ते २०५० ह्या वर्षादरम्यान वायू प्रदुषनाची कमी आणि जास्त वाढ झाल्यास हवामानावर किती परिणाम होईल ह्यानुसार महाराष्ट्रातील आणि देशाच्या पश्चिम राज्यातील हवामान बदलाचा अंदाज व्यक्त केला आहे.IMD ची आकडेवारी आणि CORDEX (Coordinated Regional Climate Downscaling Experiment) मोडेल च्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्वच जिल्हा निहाय खालील अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आधीच भारत देश हवामान जोखीम निर्देशांकात ७ व्या आणि नैसर्गिक आपत्ती निर्देशांकात ३ क्रमांकावर आहे.ह्या पार्श्वभूमीवर हा अहवाल खूप धोक्याची सुचना देत आहे.
नागपूर
नागपूर मध्ये पावसात वाढ – १९९०-२०१९ ह्या मागील ३० वर्षाच्या तुलनेत २०२१-२०५० ह्या टप्यात नागपूर मध्ये सध्याच्या प्रदुषणाच्या तीव्रतेनुसार भविष्यात २ ते ५ दिवस पावूस वाढणार आहे. एकूण सरासरी पावूस पहिल्या टप्प्यात ८ % तर प्रदूषण वाढल्यास ११ % टक्के वाढेल .अश्याच अंदाजानुसार खरीप हंगामात पहिल्या टप्प्यात ७ टक्के तर दुसऱ्या टप्प्यात १२ % आणि रब्बी हंगामात ११ ते २७ % वाढ अपेक्षित आहे. अति पावासाच्या घटना १ ते २ होणार आहेत. ढग फुटी सारख्या १ ते ३ घटना घडण्याचा अंदाज आहे.
तापमान वाढ- असेच वायू प्रदूषण वाढत राहिले तर नागपुरात उन्हाळ्यात तापमान १.१ डिग्री वाढेल आणि प्रदूषणाची तीव्रता वाढल्यास २.२ डिग्री वाढ होण्याची शक्यता आहे. ह्याच पद्धतीने हिव्वाळ्यात सुद्धा प्रदुषणाच्या पहिल्या टप्यात १.६ तर दुसर्‍या वाढत्या टप्यात २.८ डिग्री वाढ होणार असल्याचा अंदाज आहे.
—————————————————————————————————————————–
विदर्भात तापमान वाढीचा धोका वाढणार
तापमान वाढ होणार – विदर्भातील सर्वच जिल्ह्यात वाढत्या वायू प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर २०३० च्या पार्श्वभूमीवर उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात तापमान १ ते २ डिग्री वाढण्याचा अंदाज अभ्यासात व्यक्त करण्यात आला आहे.काही जिल्ह्यात उष्ण लहरी चे प्रमाण कमी होणार असल्या तरी त्यांची तीव्रता वाढणार आहे.विशेषता चंद्रपूर जिल्ह्यातील ही तीव्रता वाढणार असल्याचे म्हटले आहे.जिल्हानिहाय तापमानाचे अंदाज पाहता अकोला येथे उन्हाळ्यात १.३ ते २.० डिग्री तापमानवाढ तर हिवाळ्यात १.२ ते ३.० , अमरावती येथे उन्हाळ्यात १.६ ते २.९ आणि हिवाळ्यात १.२ ते २.० डिग्री ,भंडारा येथे उन्हाळ्यात २.० ते २.६ तर हिवाळ्यात १.१ ते २.४ ,बुलढाणा येथे उन्हाळ्यात १.४ ते २.३ तर हिवाळ्यात १.६ ते २.८ , चंद्रपूर येथे उन्हाळ्यात ०.८ ते १.२ तर हिवाळ्यात १.५ ते २.४ ,गडचिरोली येथे उन्हाळ्यात ०.२ ते १.१ तर हिवाळ्यात ०.६ ते १.१ , गोंदिया येथे उन्हाळ्यात १.१ ते २.१ तर हिवाळ्यात २.३ ते ३.३ , नागपूर येथे उन्हाळ्यात १.१ ते २.२ तर हिवाळ्यात १.६ ते २.८ , वर्धा येथे उन्हाळ्यात १.१ ते २.१ तर हिवाळ्यात १.१ ते २.१ डिग्री वाढ होण्याची शक्यता आहे.वाशीम येथे उन्हाळ्यात १.२ ते १.७ तर हिवाळ्यात १.३ ते २.४ आणि यवतमाळ येथे उन्हाळ्यात १.१ ते १.७ आणि हिवाळ्यात १.२ ते २.२ डिग्री वाढ होण्याचा अंदाज आहे.
नागपूर मध्ये पावसात वाढ – १९९०-२०१९ ह्या मागील ३० वर्षाच्या तुलनेत २०२१-२०५० ह्या टप्यात नागपूर मध्ये सध्याच्या प्रदुषणाच्या तीव्रतेनुसार भविष्यात २ ते ५ दिवस पावूस वाढणार आहे. एकूण सरासरी पावूस पहिल्या टप्प्यात ८ % तर प्रदूषण वाढल्यास ११ % टक्के वाढेल .अश्याच अंदाजानुसार खरीप हंगामात पहिल्या टप्प्यात ७ टक्के तर दुसऱ्या टप्प्यात १२ % आणि रब्बी हंगामात ११ ते २७ % वाढ अपेक्षित आहे. अति पावासाच्या घटना १ ते २ होणार आहेत. ढग फुटी सारख्या १ ते ३ घटना घडण्याचा अंदाज आहे.——————————————————————————————————-
महाराष्ट्रात हवामान बदल
तापमान वाढीचा धोका- -येत्या २०३० पर्यंत १ अंश तर असेच प्रदूषण राहिले तर २०३०-२०५० पर्यंत २ डिग्री सेल्सियस तापमान वाढ होईल.महाराष्ट्रातील उन्हाळ्यात ०.२५ ते ०.४२ अंशाने वाढ होईल.तर हिव्वाळ्यात ०.३ ते ०.५५ अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे.ह्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्र व विदर्भात तापमान वाढ जास्त होईल.उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्रात हिवाळ्याचे तापमान मात्र कमी होईल. महाराष्ट्रातील १ पेक्षा अधिक डिग्री तापमान वाढीचे जिल्हे-भंडारा-२.० , अकोला-१.३ , अमरावती-१.६ , औरंगाबाद-१.१, बीड-१.२, बुलढाना-१.४, धुळे-१.१, गोंदिया-१.१, हिंगोली-१.२, जळगाव-१.३, लातूर-१.४,नागपूर-१.१, नंदुरबार-१.६, उस्मानाबाद-१.४, वर्धा-१.१, वाशीम-१.2, यवतमाळ-१.१ . सर्वात कमी तापमान वाढीचे जिल्ह्यात गडचिरोली,कोल्हापूर ,मुंबई,पालघर रायगड,रत्नागिरी,सांगली,सातारा,सिंधुदुर्ग,सोलापूर,ठाणे जिल्ह्याचा समावेश आहे.महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मात्र (०.८) तापमान वाढ आणि उष्ण लहरी कमी होणार असल्याचे म्हटले आहे.
प्रदूषण असेच वाढत राहिले तर २०५० पर्यंत सर्वाधिक तापमान वाढ अकोला-२.५ ,अमरावती -2.९,औरंगाबाद 2.९,भंडारा-२.६ ,बुलढानां -२.३ ,धुळे २.२ ,गोंदिया-२.१ , हिंगोली-२.२,जळगाव-२.५,जालना-२.७ ,नागपूर -२.२ ,नंदुरबार-२.५,नाशिक-२.४,वर्धा-२.१,वाशीम-२.३, डिग्रीने वाढेल असा इशारा देण्यात आला आहे.
उष्ण लहरीत वाढ होईल- महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्याचा अभ्यास केला असता मागील अनेक वर्षाच्या तुलनेत चंद्रपूर मध्ये उष्ण लहरीच्या घटनात वाढ झाली आहे,परंतु आनंदाची बाब म्हणजे चंद्रपूर येथे उष्ण लहरीचे दिवस काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे परंतु अत्याधिक तीव्रतेच्या उष्ण लहरी २०३० त्ते २०५० काळात वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
पावूस आणि मान्सून चे दिवस वाढणार- २०२१-२०५० च्या अनुमानानुसार महाराष्ट्रातील यवतमाळ वगळता सर्वच जिल्ह्यात पावूसाचे दिवस ३ ते ९ दिवसाने वाढणार आहे.वाशीम-९ ,जालना -८ .चंद्रपूर,अहमदनगर,गडचिरोली,जालना,सातारा,नंदुरबार -७ . अकोला, बुलढाणा,उस्मानाबाद,पुणे,सांगली ,वर्धा-५ दिवस. उर्वरित जिल्ह्यात २ ते ४ दिवस. वाढत्या प्रदुषणाच्या अनुमानानुसार सर्व जिल्ह्यात २ ते ८ दिवस पावूस वाढणार.वाशीम-८ ,मुंबई-७ ,चंद्रपूर,अहमदनगर,गडचिरोली,जालना,सातारा – ६ , अकोला,बुलढाणा,नंदुरबार,उस्मानाबाद,पुणे,सांगली,वर्धा- ५ . उर्वरित जिल्ह्यात २ ते ४ दिवस पावूस वाढणार.
वाढत्या वायू प्रदुषणाच्या अनुमानानुसार पूर्व ते पश्चिम महाराष्ट्रात सरासरी पावसाचे प्रमाण १ ते २९ टक्याने वाढेल.गोंदियात १% तर पुणे येथे २९% वाढ होईल. चंद्रपूर-१५ %, आणि सर्वाधिक प्रदुषणाच्या अनुमानानुसार गोंदियात ३ % तर पुणे ३४% वाढीचा अंदाज आहे.सन.
सरासरी पावसाच्या बाबतीत सर्वाधिक पावूस वाढणारे जिल्हे-अकोला १७-२५%,भंडारा-१७-२०%,बुलढाणा,चंद्रपूर-१४%,नाशिक-१५-१६%,पुणे २५-२९%,रत्नागिरी-१७-२०%,सातारा-१९-२४%,सोलापूर-१५-१९%,वर्धा-१९-२२%वाशीम-१८-२१% आणि यवतमाळ-१७-१९%.
खरीप (जून-सप्टे) हंगामात पावसाची अनियमितता १०% ने वाढेल त्यात औरन्गाबाद,रत्नागिरी,आणि मुंबई विभागाचा समावेश अक्षेल. खरीप हंगामापेक्षा अनेक जिल्ह्यात रब्बी (ऑक्टो-डीसे.) हंगामात पावसाचे प्रमाण आणि दिवस वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.त्यात सर्वाधिक वाढ गडचिरोली-१९-२२%,गोंदिया-३३-४३%,नंदुरबार-५७-८१%,उस्मानाबाद-१८-३२%,पालघर-१९-३१%,पुणे-२०-३२%,रायगड-२७-४१%,रत्नागिरी-३९-६१५,सांगली-२३-३३%,ठाणे-२५-४१%,वर्धा-३९-४२% राहण्याचे अनुमान आहे.
अति पावसाचा धोका – २०२१-२०५० पर्यंत भंडारा जिल्हा वगळता सर्व जिल्ह्यात १ ते ५ दिवस अति पावसाच्या (५१-१०० मिमी एक दिवस) घटना वाढणार आहे.सिंधुदुर्ग-५ ,बुलढाणा-४ ,हिंगोली,लातूर,बीड,सोलापूर आणि औरंगाबाद ३ घटना.२० जिल्ह्यात 2 तर ८ जिल्ह्यात १ घटना .अति प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात २ ते ८ घटना (१०० मिमी.एक दिवस ) घडतील त्यात सिंधुदुर्ग-८,बुलढाणा,हिंगोली-५,अहमदनगर,औरन्गाबाद,कोल्हापूर,लातूर ,नांदेड,परभणी,सांगली,सोलापूर आणि वाशीम प्रत्येकी ४ घटना,१५ जिल्ह्यात ३,तर ८ जिल्ह्यात २ घटना घडेल.
ह्या अति पावसामुळे महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्याना फायदा होणार आहे-त्यात धुळे,सातारा,सांगली रत्नागिरी,सिंधुदुर्ग,अहमदनगर,पुने ह्यांचा समावेश असेल.
अतिशय मोठ्या पावसाच्या घटना- २०२१-२०५० पर्यंत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात १ ते २ घटना घडेल.त्यात बुलढाणा,हिंगोली,कोल्हापूर,नाशिक,उस्मानाबाद,परभणी,रायगड,सांगली,सातारा येथे 2 घटना,उर्वरित जिल्ह्यात प्रत्येकी १ घटना. तर अति प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यात १ ते ३ घटना घडेल.हिंगोली,नांदेड,नाशिक,उस्मानाबाद,परभणी ,रायगड,सांगली,कोल्हापूर,वाशीम,वर्धा ,मुंबई येथे ३ घटना.उर्वरित १६ जिल्ह्यात २ आणि ८ जिल्ह्यात १ घटना घडतील.
बदलत्या हवामांचाचे गंभीर परिणाम-
महापूर- तापमान वाढीमुळे आणि हवामान बदलामुळे कमी काळात अधिक पावूस पडेल ,पावसाचे दिवस वाढेल आणि त्यांचा परीनाम नदी जवळ वसलेल्या नागरी आणि शहरी भागावर पडेल.नागरिकाच्या विस्थापनाच्या समस्या निर्माण होइल आणि शेतीवर गंभीर परिणाम होईल.
शेती – शेतीतील विविध पिकांसाठी कमी-अधिक तापमानाची आणि कमी -अधिक पावसाची गरज असते परंतु वाढलेले तापमान आणि पावूस ह्यामुळे पिकांची नासाडी होईल,रोगराईचे प्रमाण वाढेल आणि एकूणच कृषी क्षेत्राचे अतोनात नुकसान होईल.
वने,वन्यजीव- वाढत्या तापमानामुळे वने ,वन्यजीव आणि एकूणच परिसंस्थेवर परिणाम होईल. वृक्षावर कीटकांचे प्रमाण वाढेल आणि वाण्याजीवाना होणाऱ्या रोगराईचे सुधा प्रमाण वाढेल.जंगलात जैविक पदार्थाची वाढ झाल्यामुळे जंगलातील आगीचे प्रमाण वाढेल,
आरोग्य – वाढत्या तापमानामुळे आणि पावसाचे प्रमाण वाढल्याने विविध विषाणू आणि जीवाणूंची वाढ होऊन त्याचा परिणाम रोगराई वाढण्यावर होईल. अति तापमानामुळे आणि उष्ण लहरीमुळे मृत्यूचे प्रमाण वाढेल ,कामांच्या तासावर आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल.
विकास कामावर परिणाम- अतिशय पावसामुळे उद्योग आणि विकास कामाचे नुकसान होईल .रस्ते,पूल,वीजवाहिन्या ,दळन वळण, दूरसंचार इत्यादी अनेक महत्वाच्या नागरी सुविधावर परिणाम होईल.
कारणे आणि उपाय-योजना
जगातील सर्वच देशात मोठ्या प्रमाणात वाढलेले उद्योग , प्रदूषण आणि त्यातून उत्सर्जित होणारे प्रदूषित वायू ,विशेषता कार्बन डाय ओक्साइड चे प्रमाण धोक्याच्या पातळीवर वाढले आहे. तापमान कमी ठेवणारे आणि कर्बवायुचे प्रमाण कमी करणारी जंगले शेती,उद्योग आणि विकास कामासाठी तोडली जात आहे.वाढत्या लोकसंख्येमुळे जमिनीवरील वाढती शहरे,गावे,विकासाकामे ह्यामुळे जमिनीचे वाळवंटीकरण होत असून त्यामुळे अर्बन हिट आणि परिसरातील उष्णतामान वाढत आहे,
आज वाढलेले जागतिक तापमान कितीही प्रयत्न केल तरी पुन्हा पुढे १० वर्षे कमी होणार नाही ,परंतु तत्काळ उद्योगातून , थर्मल पॉवर स्टेशन मधून उत्सर्जित होणारे वायू आणि जल प्रदूषण कमी करणे,शहरात आणि ओद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे, ग्रामीण भागात ,रस्ते,रेल्वे ,शेती परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे, जंगलाचे प्रमाण वाढविणे , लहान बंधारे ,तळे इत्यादी जल साठे वाढविणे.निसर्ग पूरक जीवन शैली अंगीकारणे, अश्या अनेक प्रयत्नांनंतरच जागतिक आंनी स्थानिक हवामान बदल रोखल्या जावू शकते.त्यासाठी शासनाने राज्य पातळीवर हवामान बदल किती झाला त्याचा अभ्यास केरावा, कृती आराखडा आखून त्याची अंमल बजावनी करावी आनुई हवामान बदलाला कारणीभूत घटक तातडीने कमी करावे.
चंद्रपूर – दि-०६/१२/२०२३ प्रा सुरेश चोपणे
पर्यावरण अभ्यासक
अध्यक्ष -ग्रीन प्लानेट सोसायटी
माजी सदस्य-REC (२०१४-२०२३) -केंद्रीय वने,पर्यावरण आणि जल वायू परिवर्तन मंत्रालय ,दिल्ली
smchopane@gmail.com , ९८२२३६४४७३
स्पष्टीकरण-
1)CORDEX—Coordinated Regional Climate Downscaling Experiment
2 ) RCP 4.5 (medium emission concentration) and
3)RCP -8.5 (high emission concentration) scenarios.
4) The findings from this study on future climate in the 2030s (2021-2050 )are presented as change compared to the historical period for all the districts of western India