हिवरा बाजार येथे वैज्ञानिक मधमाशी पालनावर जिल्हास्तरीय चर्चासत्र आयोजित

0

नागपूर : राष्ट्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग संस्थान (निम्समे), सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने नेशनल बी बोर्ड, कृषी आणि
शेतकरी कल्याण मंत्रालय द्वारा एनबीएचएम अंतर्गत प्रायोजित आणि तेलबिज अभियानासह एकत्रित वैज्ञानिक मधमाशी पालन विषयावर जिल्हास्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.

मेसर्स एपिस मार्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या समन्वयाने व समृद्ध विदर्भ या अभियानाच्या सहकार्याने आयोजित या चर्चासत्राचे उद्दिष्ट शेतकरी आणि मधमाश्या पालकांना तेलबीज पिकांच्या उत्तम परागीकरण करण्यासाठी मधमाश्यांचा उपयोग करण्याबाबत प्रोत्साहित करणे होते जेणेकरून तेलबियांचे उत्पादन वाढेल.तसेच त्याअनुषंगाने तेलबियांच्या फुलांवरुन मधमाशी संकलनात भरघोस मदत मिळून मधसंकलनाद्वारेही शेतकर्यांना आर्थिक लाभ घेता येईल.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाची अध्यक्षता श्रीमती शांताबाई कुमरे, माजी सदस्या, नागपूर जिल्हा परिषद यांनी केली.

समारोपीय कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता नागपूर फर्स्ट संस्थेचे श्री तन्वीर मिर्झा उपस्थित होते, याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रेड स्वस्तिक सोसायटी चे संस्थापक डॉ टि एस भाल , सालई गावचे सरपंच उत्तम धराडे, निम्समेचे हिंदी अधिकारी आणि कार्यक्रम समन्वयक डॉ. शिरीष कुलकर्णी उपस्थित होते. तसेच सन्माननीय अतिथी म्हणून सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्री जमीर अहमद,नागपूर जिल्हा परिषदेचे माजी कृषी आणि पशुसंवर्धन सभापती महेश बामनोटे, एपिस मार्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक श्री. विकास क्षीरसागर, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे माजी सहाय्यक संचालक आणि मास्टर ट्रेनर सुरेश कुमार गुढे, एनटीपीएस केंद्राचे सहसंचालक जगन्नाथ गराट, कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेक चे संचालक श्री त्रिलोक मेहर,अखिल भारत रचनात्मक समाजाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष व समृद्ध विदर्भाचे प्रतिनिधी एडवोकेट राजीव देशपांडे, पंचायत समितीचे माजी सदस्य पंचम चौधरी,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक श्री कृष्णा भाल, रामटेक ऍग्रो फॉर्मर प्रोड्युसर संस्थेचे श्री गणेश अवथरे, श्री उमेश आलोकार तसेच नवसंजीवन ऍग्रो,वरघट चे सचिव अरुण अलोनी उपस्थित होते. या कार्यक्रमात शेतकऱ्यांसह १०० हून अधिक शेतकरी, महिला आणि मधमाशी पालक सहभागी झाले.

तसेच अशा प्रकारच्या उद्बोधक, रचनात्मक, व माहितीपूर्ण कार्यक्रमास सर्व सहभागी संस्थांनी एकत्रितपणे यापुढेही ग्रामस्थांचे जीवनमान कटीबद्ध उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहू हा निर्धार यावेळी केला.

या प्रसंगी प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.