पूर्व कार्यकर्त्‍यांचे 9 जुलै रोजी जिल्‍हास्‍तरीय संमेलन

0

दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दी समारोह समितीची बैठक संपन्‍न

नागपूर(Nagpur) १ जुलै :- दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दी समारोह समिती व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नागपूर महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्‍या 9 जुलैला पूर्व कार्यकर्त्यांचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

यासंदर्भातील निर्णय सेवासदन येथे झालेल्‍या श्रद्धेय दत्‍ताजी डिडोळकर जन्‍मशताब्‍दी समारोह(Birth Centenary Celebration of Reverend Dattaji Didolkar) सम‍ितीच्‍या रविवारी झालेल्‍या बैठकीत घेण्‍यात आला. विदर्भातील 11 जिल्‍ह्यांमध्‍ये अशी पूर्व कार्यकर्ता संमेलने घेतली जाणार आहेत. या संमेलनात 1975 च्या आधी ज्या कार्यकर्त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत कार्य केलेले आहे, अशा कार्यकर्त्यांचा सत्कार केला जाणार आहे.

बैठकीला दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दी समारोह समितीचे संयोजक डॉ. मुरलीधर चांदेकर(Dr. Muralidhar Chandekar), कोषाध्यक्ष विनय माहुरकर(Vinay Mahurkar), जिल्हा संमेलन प्रमुख भागवत भांगे(Bhagwat Bhange), भुपेंद्र शहाणे(Bhupendra Shahane) यांची उपस्‍थ‍िती होती.