
महिलांनी काँग्रेस पक्षात केला प्रवेश
वर्धा : थोर स्वातंत्र्य सेनानी माजी गृहमंत्री व पहिले उपपंतप्रधान लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती आणि माजी पंतप्रधान, भारतरत्न इंदिराजी गांधी यांच्या ४१ व्या पुण्यतिथी निमित्त आज दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी वर्धा जिल्हा कॉंग्रेस कमिटी च्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वर्धा शहरातील पटेल चौक येथील स्व. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला माल्यार्पन तसेच भारतरत्न स्व. इंदिराजी गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पन करण्यात आले.

यावेळी सरदार वल्लभभाई पटेल व भारतरत्न इंदिराजी गांधी अमर रहे अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर जिल्हा मुख्यालय इंदिरा सदभावना भवन येथे दोन्हीही महापुरुषांच्या अभिवादन कार्यक्रमात त्यांनी केलेल्या जीवन कार्यास उजाळा देण्यात आला.
यावेळी डॉ. अभ्युदय मेघे, सौ अरुणाताई धोटे,सुधीर पांगुळ, अविनाश उबाळे, सुनील कोल्हे, राजेश शुक्ला यांनी विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत मनोजभाऊ चांदुरकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत धोटे यांनी केले.आभार प्रदर्शन बाळाभाऊ माऊस्कर यांनी मानले.
कार्यक्रमात वर्धा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या नवनियुक्त अध्यक्षा अरुणाताई धोटे यांच्या नेतृत्वात सुनंदाताई काळे, लताताई नंदरधने, मोहिनी मरसकोल्हे, कल्याणीताई दांडेकर, वनिताताई मरसकोल्हे आदींसह महिलांचा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यात आला.

यावेळी सुरेश ठाकरे, सोनालीताई कोपूलवार, सागर सबाने, नंदकुमार वानखेडे, अभिजीत चौधरी, मार्शल राऊत, धनंजय दिघडे, मंगेश गांडोळे, अक्रम पठाण, चंद्रकांत काचोळे, आदिल शेख, अक्षय खडसे, सुनील कोपुलवार, प्रदीप वानखेडे, अंकुश मुंजेवार, आशुतोष मारतोडे, प्रभाकर धोटे, गुणवंत कुचेवार, सुहास नागदिवे, सुहास पाटील, मनीषाताई फिसके, ऋतुजाताई भोयर, रोशनाताई हजारे, स्वरूपादेवी हजारे, उज्वलाताई सोनटक्के, नरेंद्रजी मसराम, सादिक शेख, विजय नरांजे, कैलास अवथळे, संदीप सुटे, धर्मपाल ताकसांडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठी संख्येने उपस्थित होते.


















