मतदान केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

0

अमरावती (Amravati) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने अमरावती लोकसभा संघातील मतदान केंद्रावरील सोयीसुविधांची पाहणी आज जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केली. चांदूर रेल्वे येथील सुरक्षा कक्षाला भेट देऊन तपासणीही केली. चांदूर रेल्वे येथे आयोजित दुसऱ्या प्रशिक्षण केंद्राला उपस्थित राहून त्यांनी मार्गदर्शन केले. मतदान प्रक्रियेसाठी कर्तव्यावर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदानाची प्रक्रिया पारदर्शक व यशस्वीपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कटियार यांनी यावेळी दिले.
अमरावती लोकसभा मतदारसंघातील विविध मतदान केंद्राला जिल्हाधिकारी कटियार यांनी भेटी देऊन तेथील उपलब्ध सोयी सुविधा तसेच व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी अनिल भटकर, अक्षय निलंगे, तेजश्री कोरे, मनपा उपायुक्त शामसुंदर देव, अमरावतीचे तहसिलदार विजय लोखंडे, नांदगाव खंडेश्वरचे तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, चांदूर रेल्वेच्या तहसीलदार पूजा माटोदे, धामणगाव रेल्वेचे तहसीलदार गोविंद वाकडे, सुनिल पाटील नायब तहसीलदार हेमंत पाटील आदी उपस्थित होते.