

(Nagpur)नागपूर/रामटेक
रामटेक गडमंदिर येथे श्रीराम जन्मोत्सव प्रसंगी हिंदू रिसर्च फाउंडेशन रामटेक, रेड स्वस्तिक सोसायटी रामटेक, एनटीपीएस हिवराबाजार व ताई गोलवळकर महाविद्यालय रामटेक यांच्या संयुक्तवतीने दर्शनासाठी आलेल्या भाविकांना बुंदीचा प्रसाद व पाणी वाटप करण्यात आले.
जगन्नाथ गराट यांच्या नेतृत्वात राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमात देवेन्द्र अवथरे, कृष्णा भाल, त्रिलोक मेहर, कस्तुरे, अमोल एनगड, प्रो. सिंग, हर्षवर्धन देशमुख, सचिन गराट, देशपांडे, प्राचार्य जयंत देशपांडे, मेजर संदीप गवई, दिनेश बमनोटे व एनटीपीएसचे विद्यार्थी यांचा सहभाग होता.