

नवी दिल्ली(New Delhi): मुराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मंगळवारी नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन येथे आयोजित समारंभात पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. जलशक्ती मंत्रालयाच्या अखत्यारीतील जलसंपदा विभाग तसेच नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाने अलीकडेच १४ ऑक्टोबर २०२४ रोजी पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कार-२०२३ साठी संयुक्त सर्वोत्कृष्ट नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, सर्वोत्कृष्ट शाळा अथवा महाविद्यालय, सर्वोत्कृष्ट उद्योग क्षेत्र, सर्वोत्कृष्ट जल वापरकर्ती संघटना, सर्वोत्कृष्ट संस्था (शाळा अथवा महाविद्यालय वगळून) आणि सर्वोत्कृष्ट नागरी संस्था अशा एकूण ९ वर्गवारी अंतर्गतच्या विजेत्यांचा समावेश आहे. सर्वोत्कृष्ट राज्याच्या वर्गवारीत ओडिशा या झाला आहे.
प्रत्येक पारितोषिक विजेत्याला प्रशस्तीपत्र आणि चषक प्रदान केले जाणार आहे. यासोबतच काही विशिष्ट वर्गवारींकरिता रोख पारितोषिकेही दिली जाणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर जल व्यवस्थापन आणि सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करावा, या हेतूने तसेच त्याबाबत लोकांमध्ये जागृती करता यावी, या हेतूने जलशक्ती मंत्रालयाच्या अखत्यारीतील जलसंपदा विभाग तसेच नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागांनी २०१८ साली पहिल्यांदा राष्ट्रीय जल पुरस्काराला सुरुवात केली होती.