(Nagpur)नागपूर, छत्रपती सेवा प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणार्या अत्यंत प्रतिष्ठेचा ‘जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार’ प्रदान सोहळा गुरुवार, २५ जानेवारी रोजी सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. यंदा हा पुरस्कार पुण्याचे सुविख्यात संस्कृततज्ज्ञ पंडित श्री. वसंतराव गाडगीळ यांना प्रदान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श. नू. पठाण राहणार असून विशेष अतिथी म्हणून धर्मभास्कर प.पू. सद्गुरुदास महाराज यांची उपस्थिती राहील. शाल, श्रीफळ, मानपत्र आणि ५१ हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजेय देशमुख व विश्वस्त मंडळाने केले आहे.
Related posts:
बीआयटीतील हॅकाथॉनमध्ये नागपूरच्या संघांची बाजी
October 20, 2025LOCAL NEWS
विदर्भ मिनरल्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीविरोधातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमरण उपोषण माग...
October 20, 2025LOCAL NEWS
सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालय, चंद्रपूर येथे दिवाळी स्नेहमिलन सोहळा उत्साहात
October 20, 2025LOCAL NEWS