वंचितसोबत जागा वाटपाची चर्चा सूरूच – मुकुल वासनिक

0

 

नागपूर (Nagpur) – अनेक दिवसांपासून जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत अनेक बैठका झाल्या. महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी चर्चा झाली.
माघार घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत काय होत? हे सांगता येत नाही. मात्र आम्ही शेवटपर्यंत चर्चा करण्यास तयार आहोत असे काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक यांनी आज विदर्भातील प्रचार दौऱ्यावर आले असता विमानतळावर स्पष्ट केले. सांगलीचा तिढा सुटला का,असे विचारले असता शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात अजून दहा जागांवर समाधानकारक चर्चा झाली नाही तरी तुम्ही आमचंच विचारता असा सवाल करीत आमची चर्चा सकारात्मक होत आहे. लवकरच शेवटचा निर्णय येईल असे वासनिक म्हणाले.