मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील भाजपसोबत जाणार काय, अशी चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP Leader Jayant Patil) यांनी मात्र आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, जयंत पाटील यांचे समर्थक आता अजित पवारांकडून बोलावल्या गेलेल्या बैठकांना हजेरी लावू लागल्याने याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
सांगलीचे भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी जयंत पाटील यांच्याबाबत विधान केले असून त्यांनी शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे जयंत पाटील अजित पवारांच्या मार्गाने जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला जयंत पाटील यांच्या अनेक समर्थकांनी हजेरी लावली होती. अजित पवार आणि शरद पवार यांच्या अलिकडच्या भेटीदरम्यान जयंत पाटील देखील तेथे उपस्थित होते. ही कौटुबिक भेट सांगण्यात येत असताना जयंत पाटील यांच्या उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
पुन्हा जयंत पाटलांच्या राजकीय वाटचालीची चर्चा!
Breaking news
MAHARASHTRA
MAHARASHTRA
















