दिनेश बूब नामांकन अर्ज दाखल

0

 बच्चू कडू यांचे शक्तिप्रदर्शन

अमरावती(Amravati) – प्रहारच्यावतीने दिनेश बूब (Dinesh Bub) यांना उमेदवारी दिली. आज दिनेश बूब यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी  बच्चू कडू(Bachchu kadu  ) यांनी मोठं शक्तिप्रदर्शन केले. चांदूरबाजार येथून बच्चू कडू बेलोरा येथे त्यांच्या आईच्या स्मृतीस्थळाला नतमस्तक होत अमरावतीच्या दिशेने निघाले. यावेळी बच्चू कडू यांचे गावागावात जेसीबी वरून फुले उधळून फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोषात स्वागत करण्यात आले.

ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. सगळ्या पक्षातील, सगळ्या धर्मातील कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत. मी सुद्धा कार्यकर्ता म्हणूनच या निवडणुकीत आहे. आमचे नेते राजकुमार पटेल असून, त्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवत आहोत असे बच्चू कडू यांनी सांगितले. बच्चू कडू यांनी साडीच्या मुद्द्यावरून पुन्हा नवनीत राणा, रवी राणावर टीका केली. दोन कोटीच्या गाडीत फिरायचं आणि सतरा रुपयाची साडी वाटायची, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.