
बुलढाणा – बुलढाणा जिल्ह्यात 26, 27 नोव्हेंबरला बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे हरभरा, कापूस, गहू, तूर या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा, लोणार, देऊळगाव राजा या भागामध्ये गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उभे असलेल्या (सिडनेट) शेडनेट चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सिडनेटचे प्लॉट जमीन दोस्त झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांच नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी आज जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे. त्यांनी सिंदखेडराजा देऊळगाव राजा तालुक्यातील सावरगाव माळ पळसखेड चक्का देऊळगाव या गावातील झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे.