

नागपूर (Nagpur) २० जुलै :– “सुव्यवस्थित डिजिटल फूटप्रिंट वैयक्तिक आणि संस्थात्मक ब्रँड बिल्डिंगमध्ये लक्षणीय योगदान देऊ शकते, त्यामुळे ते अत्यंत महत्वाचे आहे,” असे दोशी ग्रुपचे ग्रुप-चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर चिराग वार्टी यांनी सांगितले. सिव्हिल लाइन्स येथील चिटणवीस सेंटर येथे विदर्भ मॅनेजमेंट असोसिएशन (व्हीएमए) द्वारे आयोजित साप्ताहिक सत्रात ते बोलत होते.
‘ओनर वर्सेस ऑर्गनायझेशन – ब्रँड फाईट’ या विषयावर बोलताना, दोन दशकांहून अधिक काळ धोरणात्मक अनुभव असलेले वार्टी यांनी आजच्या व्यवसायाच्या क्षेत्रात डिजिटल ओळखीचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. विशेषतः संस्थेच्या मालक/ ओनर साठी एक मजबूत वैयक्तिक ब्रँड तयार करण्यासाठी, त्यांनी लिंक्डइनला प्राथमिक प्लॅटफॉर्म म्हणून आणि इंस्टाग्रामला दुसऱ्या क्रमांकाचे प्लॅटफॉर्म म्हणून वापरण्याचा सल्ला दिला. वार्टी यांनी अतिरिक्त ब्रँडिंग साधन म्हणून वैयक्तिक वेबसाइट तयार करण्याचे सुचवले आणि लिंक्डइनच्या सोशल सेलिंग इंडेक्स (एसएसआय) चे देखील महत्त्व समजावून सांगितले. सत्राचे संचालन रंजन अग्रवाल यांनी केले, तर निकेत अग्रवाल हे सत्र प्रभारी होते.