
खासदार सास्कृतिक महोत्सव समितीद्वारे शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण
मुंबईतील आझाद मैदानावर मुखयमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा सुरू असताना इकडे नागपुरात ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे पटांगणात ढोलताशाचा गजर आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या अभूतपर्व सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी पटांगणावर मोठ्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली.
खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे वतीने हनुमान नगर येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर नागपूरकरांसाठी ऐतिहासिक ठरलेल्या या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्याकरिता ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव – 2024’ च्या कार्यालयासमोर मोठा स्क्रीन लावण्यात आला होता. या स्क्रीनवर नागपूरचे सुपुत्र मा.श्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर मा. श्री. एकनाथ शिंदे व मा. श्री. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ढोलताशाच्या तालावर सर्वांनी नृत्य सादर केले. यावेळी पेढे वाटण्यात आले तसेच, फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, सचिव जयप्रकाश गुप्ता, अशोक मानकर, किशोर पाटील, महेंद्र राऊत, विलास त्रिवेदी हजी अब्दुल कादीर, डॉ दीपक खिरवडकर, प्रमोद पेंडके, आशिष वंदिले, विजय फडणवीस आदी मोठ्या संख्येने या जल्लोषात सहभागी झाले होते. सर्वांनी एकमेकाचे अभिनंदन करीत आनंदोत्सव साजरा केला.















