

नवी दिल्ली:- बीसी वेलफेयर अशोसीयेशन तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघ, यांच्या संयुक्त पणे 9 आगस्ट क्रांती दिनी जंतर – मंतर (Jantar Mantar) येथे धरणा आंदोलन करण्यात आले. प्रामुख्याने जातनिहाय जनगणना करण्यात यावी, केंद्रात स्वतः त्र मंत्रालय स्थापित करण्यात यावे, आरक्षणात 50%मर्यादा हटविण्यात यावी, 13 सप्टेंबर 2017 पासून क्रिमिलेअरची मर्यादा वाढविण्यात आली नाही ती वाढविण्यात यावी, ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नती मध्ये आरक्षण देण्यात यावे व ईतर मागण्या घेऊन आंदोलन करण्यात आले. त्या वेळी आंदोलनात 9 ऑगस्ट 2024′ जंतर – मंतर न्यू दिल्ली येथे जातनिहाय जनगणना, केंद्रात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय, क्रिमि्लेअर ची मर्यादा वाढविणे या साठी आंदोलन करण्यात आले.
त्या वेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, बीसी वेफेअर असोशीयेशन अध्यक्ष तेलंगणा श्रीनिवास जाजूला, आंध्रप्रदेशचे अध्यक्ष शंकर अण्णा, विक्रम गौड, क्रांती कुमार शाम अण्णा सुधाकर काकडे, ललित निमकर, शामकांत थेरे, सुभाष जुनघरे,डॉ. किशोर जेनेकर, मुन्ना ठाकुर, शेख भाई , परविंदरसिंग उत्पल, भगवती पिदुरकर, अंकुश चौधरी, मुकेश अतकरी, दिनकर शिंनगारे, दिनेश कष्टी, महेश खंगार, रणजित डवरे उपस्थित होते.