धनगर मोर्चाला हिंसक वळण, दगडफेक

0

जालना JALNA – धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पेटला असून जालन्यात निघालेल्या धनगर समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण लागले. मोर्चातील जमावाने जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार तोडून दगडफेक केल्याची घटना घडली. (Dhangar Community Morch in Jalna)
धनगर समाजाच्या आरक्षणप्रकरणी निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी आले पाहिजे, यावर मोर्चेकरी ठाम राहिले. परंतु, जिल्हाधिकारी न आल्याने मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य गेट तोडून आत गेले. त्यानंतर जमावातील काहींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केली. यात दोन शासकीय वाहनांच्या काचा फुटल्या. आवारातील कुंड्यांची तोडफोड करण्यात आली. मुख्य प्रवेशद्वार तातडीने बंद केल्याने मोर्चेकऱ्यांना आत जाता आले नाही. दरम्यान, जवळपास ३० मिनिटांनंतर मोर्चेकऱ्यांना शांत करण्यात यश आले. दरम्यान, मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आले होते. प्रशासनाने कोणतीही ताठर भूमिका घेतली नाही,असा दावा जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केला आहे.