

मा. माधवी लताजी हयांच्या शुभहस्ते समोराप सोहळा
नागपूर (Nagpur) दि. 28 ऑगस्ट 2024 :- देवता लाईफ फाऊंडेशन ही सामाजिक व सेवाभावी संस्था असुन “निराधारांवा आधार हे या संस्थेचे ब्रिदवाक्य आहे. ही संस्था गेल्या 9 वर्षापासून 12 वर्षाच्या आतील कॅन्सरग्रस्त असणा-या मुलांसाठी सदैव कार्यरत असून 35 मुलांचे संगोपन करीत असून मुलांची संख्या वाढतच आहे. सदर संस्था कॅन्सर पिडीत मुलांच्या औषध तसेच ऑपरेशनचा खर्च सुध्दा करीत असते
देवता लाईफ फाऊंडेशन तर्फे “एक रुपया दान, कॅन्सर मुक्त अभियान” ही लोकचळवळ राबविण्यात आली असून या अभियानाचा समोराप कार्यक्रम दि. 31 ऑगस्ट 2024 रोज शनिवारला दुपारी 2.00 वाजता देवता लाईफ फाऊंडेशनचे अध्यक्ष मा. श्री. किशोर वावणे यांच्या अध्यक्षतेखाली व हैद्राबाद येथील राजकारणी मा. माधवी लताजी याच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सेवा सदन शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा मा. सौ. कांचनताई गडकरी व नागपूर महिला क्लबच्या अध्यक्षा मा. सौ. विलासीनी नायर, हयांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. हा कार्यक्रम प्लॉट क्र. 42-A सीताराम भवन, 5 वा माळा, रामनगर चौक, नागपूर येथे होणार आहे.
या अभियानाचे मुख्य उदिष्ट म्हणजे सर्व युवा पिढीनी एकत्रित येऊन या “एक रुपया दान, कॅन्सरमुक्त अभियानात” मदत करून मोठ्या आजारातून त्यांना मुक्त करणे व जीवनदान देणे. त्याकरीता सर्व युवा पिढीनी जास्तीत जास्त संख्येने जुळावे, असे आवाहन सत्त्वेचे अध्यक्ष किशोर बावणे यांनी केले होते. कॅन्सर हा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे त्यावर प्रतिबंध व उपचार पध्दतीवर काम करणे हे गौरवास्पद आहे. सदर अभियानाला उत्कृट प्रतिसाद मिळालेला असून सर्वांनी सर्वोतोपरी मदत केली आहे.
सदर संस्थेने कॅन्सरग्रस्त मुलांकरीता व त्यांच्या पालकांसाठी गोटाळपांजरी येथे सर्व
सोयीयुक्त असलेला केअर सेंटर बाधण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कॅन्सरग्रस्त मुलाच्या पालकासाठी स्वयंरोजगार सुरु करुन त्याना स्वावलंबी बनवणार असल्याचे तसेच महिलाना शिलाईचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. असे सौ. निलिमा बावणे म्हणाल्या
सदर कार्यक्रमास देवता लाईफ फाऊंडेशनचे सल्लागार श्री. विवेक जुगाडे, उपाध्यक्षा कस्तुरी बावणे संचालिका सी सारिका पेडसे व सर्व देवदुत उपस्थित राहणार आहेत.