चंद्रपूरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारावी

0

– आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली अपेक्षा

चंद्रपूर (Chandrapur) : विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारण्याची मागणी केली आहे.

राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाची प्रक्रिया पूर्ण होऊन पंधरा दिवस उलटले असले तरी, जिल्ह्याचा पालकमंत्री अद्याप जाहीर झालेले नाही. यासंदर्भात पत्रकारांनी विचारणा केली असता, किशोर जोरगेवार यांनी सांगितले की येत्या एक-दोन दिवसांत पालकमंत्री पदाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

यंदा चंद्रपूर जिल्ह्याला मंत्रीपद न मिळाल्याने पालकमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली हे जुळे
जिल्हे असल्याने या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जिल्ह्याच्या प्रगतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री पद स्वीकारावे, अशी अपेक्षा जोरगेवार यांनी व्यक्त केली आहे.

फडणवीस हे चंद्रपूर जिल्ह्याचे भूमिपुत्र असल्याने जिल्ह्याच्या समस्या आणि विकासात्मक गरजा त्यांना चांगल्या प्रकारे माहित आहेत. त्यामुळे पालकमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारून जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान द्यावे, अशी मागणी जोरगेवार यांनी केली आहे.