आमदार गोवर्धन शर्मा यांचे अंत्यदर्शनासाठी देवेंद्र फडणवीस अकोल्यात

0

 

अकोला AKOLA – जिल्ह्यातील अकोला पश्चिम मतदार संघाचे BJP भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा  Govardhan Sharma यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. आज शनिवारी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडणार आहे. अंतिम दर्शन घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोल्यात दाखल झाले असून त्यांनी अंतिम दर्शन घेतले. त्यांच्यावर मुंबईच्या रुग्णालयात अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते.

मात्र, काही दिवसापूर्वीच त्यांना घरी आणण्यात आलं. उपचारदरम्यान शर्मा यांचा त्यांच्या राहत्या घरी मृत्यू झाला. तब्बल तीन दशके आमदार राहिलेले लालाजी असे नेते होते की, त्यांना निवडणुकीत उभं करण्यासाठी आम्हाला मागे लागावं लागत होतं. मंत्रीपद भेटल्यानंतर सोडून दिलं. अनेक नेत्यांकडे फोन असूनही ते उपलब्ध नसतात. परंतु लालाजी यांच्याकडे फोन नव्हता, ना ते व्हाट्सअप वर होते, ना सोशल मीडियाचं टेंशन होतं. तरीही ते 24 तास लोकांसाठी अवेलेबल राहायचे. असा मॅन टू मॅन लालाजींचा लोकांशी संपर्क होता, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी भावना व्यक्त करून लालाजींना श्रद्धांजली वाहिली.