

आशा भगिनींच्या पाठिशी राज्य सरकार भक्कमपणे उभे!
महिला विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध!
आरोग्यासह सर्वांच्या परिवाराची काळजी घेणाऱ्या आशा भगिनींच्या कामांमध्ये सुकरता यावी तसेच त्यांची कार्यक्षमता वाढावी यासाठी सरकारने ॲण्ड्रॉइड फोन देण्याचा निर्णय घेतला. यासोबतच त्यांच्या मोबाईलला वार्षिक रिचार्ज देण्याचीही व्यवस्था खनिज निधीतून करण्यात आली आहे. आशा सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा तसेच त्यांना ₹10 लाखांपर्यंतचा विमा देण्याचा निर्णय देखील शासनाने घेतला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नागपूरच्या नवनिर्मित प्राथमिक आरोग्य केंद्र व निवासस्थानांचे आज रेशीम बाग, नागपूर येथे लोकार्पण केले. यासोबतच घाटपेंढरी (ता. पारशिवणी), भोरगड आणि झिल्पा (ता. काटोल) अशा 3 प्राथमिक आरोग्य केंद्रांचेही उदघाटन केले तसेच जिल्हास्तरीय आशा सेविकांना मोबाइल वितरण व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत नियुक्ती पत्र वाटप केले.
लाडकी बहीण योजने अंतर्गत महाराष्ट्रातील 2.5 कोटी महिलांना दरमहा ₹1500, महिलांना उच्च शिक्षणातील 560 कोर्स विनामूल्य, एसटी प्रवासात 50% सूट, 3 गॅस सिलेंडर मोफत, हे सारे निर्णय महायुती सरकारच्या महिला केंद्रीत धोरणाचे प्रतिक आहेत.
मुख्यमंत्री शिकाऊ प्रशिक्षण योजने अंतर्गत 10 लाख तरुणांना प्रशिक्षण कालावधीत ₹10,000 वेतन राज्य सरकार देणार आहे. या योजनेअंतर्गत काहींना नियुक्तीपत्रे देण्यात आलेली आहेत. तरुणांच्या हाताला काम देण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न आहे.
यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, आ. कृपाल तुमाने, आ. प्रवीण दटके, आ. परिणय फुके, आ. आशिष जयस्वाल, आ. टेकचंद सावरकर तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.