Devendra Fadnavis दुबार पेरणीची वेळ आल्यास सरकार मदत करणार-उपमुख्यमंत्री फडणवीस

0

मुंबई Mumbai – राज्यात मागील खरीप हंगामाच्या तुलनेने ८० टक्के पेरण्या झाल्या असून पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आल्यास सरकार त्यांच्या पाठिशी राहील, अशी ग्वाही Deputy Chief Minister Devendra Fadnavis उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. (Assembly Session-2023) विरोधी पक्षांनी स्थगन प्रस्तावाच्या सूचनेच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित केल्यावर फडणवीस यांनी सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली.

फडणवीस यांनी सांगितले की, राज्यात अद्याप अपेक्षित पाऊस पडला नसला तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत जवळपास 80 टक्के पेरण्या झाल्या आहेत. पुणे विभागात पेरण्यांचे प्रमाण कमी आहे. मात्र, हवामान विभागाने पुढील काही दिवसांत चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तरीदेखील पाऊस पडलाच नाही तर सरकारने आपत्कालीन व्यवस्थेसाठी तयारी करून घेतली आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली तर यासाठी सरकारने विशेष प्लॅन तयार केला आहे. राज्यात बोगस बियाणे व खतांची विक्री करणाऱ्यांविरोधात कडक कायदे करण्यात येतील. बोगस बियाणे व खते विकणाऱ्या संबंधित कंपन्यांवरच कारवाई करून त्यांच्याकडून शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, अशी तरतूद केली जाईल, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. आतापर्यंत नुकसान भरपाईपोटी राज्य सरकारने शेतकऱ्यांना 10 हजार कोटींची मदत दिली असल्याचे त्यांनी सांगितले.