राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मुंबईकडे प्रस्थान

0

(Nagpur)नागपूर, दि. ४ : नागपूर, (gadchiroli)गडचिरोली येथील विविध कार्यक्रमात सहभागी झालेल्या (President Draupadi Murmu)राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तीन दिवसांच्या दौर्‍यानंतर गुरुवारी सकाळी मुंबईकडे प्रस्थान केले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे ४ जुलैला सायंकाळी नागपुरात आगमन झाले होते. ५ जुलै रोजी सकाळी गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ तसेच दुपारी कोराडीतील सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते झाले.गुरुवारी सकाळी त्यांनी राजभवन येथे आदिवासी समुदायातील मान्यवरांशी संवाद साधला.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना (Dr. Babasaheb Ambedkar at Nagpur International Airport)डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर आज निरोप देण्यात आला. (Governor Ramesh Bais)राज्यपाल रमेश बैस ,(Punjab Governor Banwarilal Purohit)पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित,(Deputy Chief Minister Devendra Fadnavis)उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Air Marshal Vibhas Pandey)एअरमार्शल विभास पांडे, मेजर जनरल एस. के. विद्यार्थी, (Divisional Commissioner Vijayalakshmi Bidari) विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी,(Commissioner of Police Amitesh Kumar)पोलीस आयुक्त अमितेश कुमार, (Zilla Parishad President Mukta Kokde) जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, (Collector Dr. Vipin Itankar) जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, (Superintendent of Police Vishal Anand) पोलीस अधीक्षक विशाल आनंद आदी यावेळी विमानतळावर उपस्थित होते.