वैदिक गणित’ वर विभागीय कार्यशाळा

0

वैदिक गणित’ वर विभागीय कार्यशाळा 11 व 12 ऑगस्‍ट रोजी
नागपूर (Nagpur), 6 ऑगस्‍ट
विश्व पुनर्निर्माण संघ, शिक्षा संस्कृती उत्थान न्यास – नागपूर व नागपूर विद्यापीठ गणित शिक्षक संघटना (एनयुएमटीए)यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वैद‍िक गणित’ विषयावर दोन दिवसीय विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले आहे. येत्‍या, 11 व 12 ऑगस्‍ट रोजी भारती कृष्ण विद्या विहार, तेलंगखेडी, सिव्‍हील लाईन्‍स येथे ही कार्यशाळा होणार आहे.
कार्यशाळेचे उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकरे यांच्‍या हस्‍ते होईल. भारतीय ज्ञान परंपरा अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठात वैदिक गणित विज्ञान हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे, हे विशेष.

विज्ञान व अभियांत्रिकी महाविद्यालयातील गणिताचे स्‍नातकपूर्व शिक्षक, विद्यार्थी, संशोधक, अभ्‍यासक व या विषयात रुची असणारे या कार्यशाळेत सहभागी होऊ शकतात. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी व नावे नोंदणीसाठी 98909 11449 किंवा 9850300765 या क्रमांकावर संपर्क साधावा.

जगद्गुरु शंकराचार्य भारती कृष्ण तीर्थजी महाराज पुरी मठ यांनी 1952 ते 1960 दरम्यान तेलंगखेडी स्थित विश्व पुनर्निर्माण संघ, द्वारा संचालित भारती कृष्ण विद्या विहार येथे चातुर्मास दरम्यान वास्तव्य केले होते. त्‍यादरम्‍यान त्यांनी ‘वैदिक गणित’ या पुस्तकाचे लिखाण केले होते व विश्‍व पुननिर्माण संघाची स्‍थापना केली. ‘वैदिक गणित’ या पुस्तकाचे हस्तलिखित आजही भारती कृष्‍ण विद्या विहारमध्‍ये उपलब्‍ध आहे. शंकराचार्यांचे हे ‘वैदिक गणित’ आज जगात सर्वत्र प्रचलित झाले आहे.