मास्क, स्टेथोस्कोप लावून विधानभवनात आंदोलन

0

नागपूर NAGPUR : राज्यातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे. सरकारी रुग्णालयांची स्थिती अत्यंत बिकट असून तिथे औषधे उपलब्ध नाहीत. रुग्णमृत्यू वाढले आहेत. औषध खरेदी थांबलेली आहे. या पार्श्वभूमीवर  Mahavikas Aghadi महाविकास आघाडीने मंगळवारी विधानभवन  Legislature परिसरात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर निशाणा साधत आंदोलन केले.  तोंडाला मास्क लावून, गळ्यात स्टेथोस्कोप घालून आणि स्ट्रेचर आणून विरोधकांनी आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचा आरो लगावला. ‘जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या सरकारचा धिक्कार असो,’ ‘नाही औषध नाही गोळी, आरोग्य व्यवस्थेची झाली होळी,’ ‘शासकीय रुग्णालयात नाहीत डॉक्टर नाहीत नर्सेस, त्यामुळे वाढताहेत मृत्यूच्या केसेस’ असे फलक घेऊन सरकारविरुद्ध निषेध नोंदविण्यात आला. गेल्या चार महिन्यांत चंद्रपूर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ४३६ मृत्यू, नांदेडमध्ये २४ मृत्यू, ठाणे-कळवा येथे २४ आणि छत्रपती संभाजीनगर येथेही २४ मृत्यू झाल्याकडे विरोधकांनी लक्ष वेधले.

नागपूर – राज्यातील कथित ढासळलेल्या आरोग्यव्यवस्थेविरोधात आज मविआच्या आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर प्रतिकात्मक आंदोलन केले.जनतेचे आरोग्य खराब करणाऱ्या सरकारची स्टेथस्कोप घेऊन तपासणी करणार असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी बोलताना केली.

गळ्यात स्टेटोस्कोप व तोंडाला मास्क घालून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधिमंडळ परिसर दणाणून सोडला. मंत्री खात तुपाशी, रुग्ण मरतायत उपाशी, रुग्णांना नाही औषध गोळी, आरोग्यव्यवस्थेची झाली होळी, अशा घोषणा आमदारांकडून दिल्या जात होत्या. यावेळी बोलताना दानवे म्हणाले की, राज्यात आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. राज्यात नागपूर,नांदेड, संभाजी नगर, कळवा या ठिकाणी औषधाविना मोठया प्रमाणात मृत्यू झाले. तरी सरकारने औषधे खरेदी केली नाहीत. राज्याची आरोग्य व्यवस्था गॅस वर आहे. सरकार जनतेचे आरोग्य राखू शकत नाही, जीव वाचवू शकत नाही की रुग्णांना ५ रुपयांची गोळी देऊ शकत नाही. याला सर्वस्वी सरकार, आरोग्यविभाग जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.